इतर

एन गौरी गणपतीच्या तोंडावर माय लेकराची आत्महत्या! मुलाने घेतला फास तर आईनी घेतली विहिरीत उडी

पालघर | गुन्हेगारी विश्वात सातत्याने वाढ होत चालली आहे. सतत वेगवेगळ्या कारणांवरून व्यक्ती एकमेकांच्या जीवावर उठले आहेत. अन्यथा सर्व परिस्थितीला कंटाळून स्वतःचे जीवन संपवत आहेत. आत्महत्येची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये मुलाने आत्महत्या केल्याने आईने देखील स्वतःचे जीवन संपवले आहे. प्रत्येक आईला आपलं मूल हे जीवापेक्षाही प्रिय असतं. त्यामुळे प्रत्येक आई आपल्या बाळासाठी त्याच्या चेहऱ्यावर आनंद यावा यासाठी धडपड करत असते.

मुलं चुकलं की, आई कान पिळून त्याला वठणीवर देखील आणते. तसेच केलेल्या चांगल्या कामासाठी कौतुकाची थाप देखील देते. अशात मुलाने आत्महत्या केल्याचे दुःख आईला कधीच न पचणारे असते. तर या आईने हे दुःख सहन करण्याची ताकत नसल्याने मुलाच्या पाठोपाठ स्वतः देखील स्वर्गवास घाठला आहे. एकाच घरातील दोन व्यक्तींच्या मृत्यूमुळे संपूर्ण गावात मोठा गदारोळ माजला आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही व्यक्तींचे मृतदेह पोलिसात तसेच डॉक्टरांकडे घेऊन न जाता त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.

कुणालाही कसलीच माहिती न दिल्याने अंतसंस्काराची घाई का केली ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालघर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. जिल्ह्यातील सफाळे कांद्रेभुरे येथे शैलेश पाटील (26) या तरुणाने आधी आत्महत्या केली. त्याच्या कुटुंबात आई कल्पना पाटील, त्याचे वडील आणि बहीण असे चौघेजण राहत होते. शेतामध्ये असलेल्या झाडाला कळतात घेऊन शैलेशने आपले जीवन संपवले. त्यानंतर त्याची आई कल्पना यांनी देखील आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. आपलं मुली या जगात नाही ही कल्पनाच त्यांना सहन होत नव्हती. त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली.

या घटनेत स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार शैलेश हा अतिशय साधा मुलगा होता. काही दिवसांपूर्वीच व्हाट्सअप मार्फत त्याचे एका मुली बरोबर बोलणे झाले होते. ही मुलगी त्याची मैत्रीण होती. मात्र तो सेक्सटोर्शनचा बळी गेल्याचे म्हटले जात आहे. त्याला होत असलेल्या या त्रासामुळेच तसेच बदनामीच्या भीतीमुळे त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे त्याच्या आईने विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली. घटना घडल्यानंतर कल्पना यांचे पती आणि त्यांची मुलगी या दोघांनी देखील कल्पना आणि शैलेश यादव यांना रुग्णालयात नेले नाही. त्यांनी स्वतःच त्यांचा जीव गेला आहे असे ठरवले. त्यांनी याची पोलिसांना देखील माहिती दिली नाही. तसेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार देखील करून टाकले. यामुळे या प्रकरणात वेगवेगळे संशय पोलिसांच्या मनात येत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close