मनोरंजन

अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन बॉलिवूडमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता?

मुंबई|


बॉलीवूड अभिनेता अजय देवगणची मुलगी न्यासा देवगन सध्या सतत चर्चेत असते. न्यासा देवगणचे फोटो आणि व्हिqडिओ दररोज इंटरनेटवर व्हायरल होत आहेत, जे पाहून चाहत्यांचेही होश उडाले आहेत. न्यासा देवगनचा असाच एक फोटो इंटरनेटवर पसरत आहे ज्यामध्ये ती तिच्या मित्रासोबत पार्टी करताना दिसत आहे. या फोटोमध्ये न्यासा देवगनने हातात वाईनचा ग्लास धरला आहे, ज्यामुळे लोक तिला ट्रोल करत आहेत. न्यासा देवगणच्या या फोटोवर एका व्यक्तीने लिहिले आहे की, ‘मोठ्या लोकांना मोठे छंद असतात.’

न्यासा देवगनचे ग्लॅमरस फोटो पाहिल्यानंतर चाहत्यांनी तिच्या बॉलीवूड डेब्यूबद्दल अंदाज बांधायला सुरुवात केली आहे. न्यासाचे ग्लॅमरस फोटो व्हायरल होत असताना काजोल आणि अजय देवगणची मुलगी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल असा विश्वास चाहत्यांना आहे.

मात्र, अजय देवगणने काही दिवसांपूर्वी मीडियाशी बोलताना सांगितले होते की, न्यासा अजूनही खूप लहान आहे आणि मुलांचे प्लॅन वेळोवेळी बदलत राहतात. न्यासाला भविष्यात काय करायचे आहे, हे भविष्यातच कळेल. अजय देवगणबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याचा आगामी चित्रपट ‘रनवे 34’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत रकुलप्रीत सिंग आणि अमिताभ बच्चन दिसणार आहेत. ‘रनवे 34’ हा चित्रपट ईदच्या मुहूर्तावर बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close