अरे बापरे! रिंकू राजगुरुने नागराज मंजुळे यांच्या विषयी केला धक्कादायक खुलासा म्हणाली, ” तो डोक्यात…

मुंबई| ती आली आणि पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार झाली. अशी अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू. रिंकूने सैराट या चित्रपटातून तिचा बिनधास्त अभिनय सर्वांना दाखवला. तिच्या अभिनया बरोबरच अनेक जण तिच्या प्रेमात देखील पडले. रींकुचा बिनधास्तपणा आपल्याला सैराटमध्ये पाहायला मिळाला. अशात ती तिच्या खऱ्या आयुष्यात देखील तितकीच निर्भिड आहे.
सैराट नंतर तिने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले. अशात नुकताच तिचा आठवा रंग प्रेमाचा हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तिने ऍसिड हल्ला झालेल्या मुलीची भूमिका केली आहे. तिचा हा चित्रपट देखील हिट ठरला आहे. अशात याच चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ती मराठी किडा या चॅनलवर आली होती. इथे तिची मुलाखत घेण्यात आली.
यावेळी तिला नागराज मंजुळे यांच्या विषयी एक प्रश्न विचारण्यात आला. यावर रिंकूने दिलेलं उत्तर ऐकून सर्वजण चकित झाले आहेत. तसचं सगळीकडे तिच्या या उत्तराची चर्चा रंगली आहे. रींकुला अडचणीत टाकणारा एक प्रश्न तिला विचारण्यात आला होता. आता तो प्रश्न आणि त्यावर रींकुने नेमक काय उत्तर दिलं आहे हे पाहू.
मुलाखत देत असताना तिला विचारण्यात आलं की, नागराज मंजुळे यांच्या डोक्यात जाणाऱ्या कोणत्याही पाच गोष्टी सांग. आता हा प्रश्न तिच्यासाठी खूप कठीण होता. तिने बराच वेळ विचार केला. नंतर ती म्हणाली की, अशी कोणतीच गोष्ट नाही. मात्र तिला फोर्स करण्यात आला. मुलाखत घेणाऱ्या व्यक्तीने तिला सांगितले की, प्लीज माझ्या कंटेंट साठी बोल…त्यावर ती म्हणाली की, ते कुणाचं काहीच ऐकत नाहीत. त्यांच्या मनात आहे तसचं त्यांना सगळ काही करायचं असतं. आता यावर पुढे ती अस देखील म्हणाली की, अण्णा मी हे फक्त याने सांगितलं म्हणून बोलत आहे.
मुलाखतीत नंतर तिला नागराज यांच्या मनात बसणाऱ्या गोष्टी कोणत्या? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर तिने उत्तर दील की, “ते खूप साधे आणि प्रेमळ आहेत. त्याला तुम्ही जितका जीव लावला तितकाच तो देखील आपल्याला जीव लावतो. ” रिंकू ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. मात्र तिला मिळालेली प्रसिध्दी ही नागराज मंजुळे यांच्यामुळेच मिळाली आहे हे नाकारून चालणार नाही.