धक्कादायक! 75 व्या स्वातंत्र्यदिनी देशाला काळिंबा फासणारी घटना उघडकीस, ६ नराधमांनी अल्पवयीन मुलीवर केला….

औरंगाबाद | आज संपूर्ण देशात 75 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अनेक लहान मुलांनी दरवर्षीप्रमाणे शाळेमध्ये मोठ्या गाजावाजात स्वातंत्र्य दिवस साजरा केला. एकीकडे आपला भारत देश वेगवेगळ्या कामांमधून प्रगती करत आहे तर दुसरीकडे अजूनही महिलांवरील अन्याय अत्याचार थांबलेले नाहीत.
अजूनही खेड्यापाड्यांमध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत. अगदी अल्पवयीन मुलींवरचे अत्याचार देखील थांबलेले नाही. एकीकडे देशाची प्रगती होत असली तरीदेखील दुसरीकडे अशा पद्धतीने महिलांवरील अत्याचार सुरू असल्याने देशाच्या स्वातंत्र्यावर आणि महिलांच्या स्वातंत्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अल्पवयीन मुलीवर ६ माणसांनी अत्याचार केला आहे. या सहा व्यक्तींनी अल्पवयीन मुलीला धमकी देत तिच्यावर केला आहे. या घटनेनं सगळीकडे संतापाची लाट उसळली आहे.
कन्नड पोलिसांकडे सदर घटनेबाबत गुन्हा दाखल केला असून यावर अधिक चौकशी सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलीवर ज्या सहा नराधमांनी आत्यचार केला आहे त्यातील काहींनी या आधी देखील तिच्यावर अत्याचार केला होता. तसेच रस्त्यावर नेहमीच ते तिची छेड काढत होते.
पिडीत मुलगी गरीब कुटुंबातील आहे. त्यामुळे तिने घरची परिस्थिती पाहून या बाबत कधीच घरी सांगितले नाही. मात्र यामुळे त्या नराधमांचा रस्ता आणखीन सोपा झाला. ते तिला घाबरवून धमकी देऊ लागले. यात अल्पवयीन मुलगी देखील घाबरली त्यामुळे ती पुन्हा एकदा फसली गेली. यावेळी सहा जणांनी तिच्यावर अत्याचार केल्याने तिला असह्य वेदना होत होत्या. ती खूप आजारी पडली. त्यावेळी तिच्या आईला तिने झालेल्या घटनेबद्दल सांगितले.
हे ऐकून तिच्या आईच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र तिने तातडीने पोलीस स्टेशनला धाव घेतली. यावेळी मुलीची चौकशी करण्यात आली. अल्पवयीन मुलीने देखील झालेला सर्व प्रकार जसाच्या तसा सांगितला. पिडीत मुलीचा जबाब नोंदवून कन्नड पोलिसांनी लगेचच यावर गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत.