रक्षाबंधनच्या दिवशी घरात मृत देहांचा खच, १४ वर्षीय पुतण्यासह, सासू , दिर, जवेची सुनेने केली निर्घृण हत्या कारण जाणून धक्काच बसेल

नवी दिल्ली | राखी पौर्णिमेच्या दिवशी एकाच घरातील चार व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. घरातील छोट्या सुनेने आपली सासू , दिर, जाव आणि पुतणी अशी चार व्यक्तींची कटरच्या साहाय्याने हत्या केली आहे. या घटनेने परिसरात शोकाकुल आणि भीतीचे वातावरण पसरले आहे. घरातील शुक्कल कारणावरून हा वाद झाला आणि त्या महिलेने चक्क चार जणांच्या नरडीचा घोट घेतला.
पश्चिम बंगालमध्ये ही घटना घडली. सासू माधवीवर (वय 58) दीर देवाशीष ( वय 36) रेखा (वय31) आणि पुतणीवर (वय 13) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत. या घरातील लहान सून पल्लवी घोशने या सगळ्यांची हत्या केली आहे. आता ती पोलिसांच्या ताब्यात आहे. मात्र तिचा पती बेपत्ता आहे. पोलिस त्याचा देखील शोध घेत आहेत. या गुन्ह्यात तो देखील शामील असल्याचा पोलिसांना संशय आहे.
रक्षाबंधनच्या दिवशी रात्री १०.३० वाजता पल्लवी तिच्या सासू बरोबर भांडू लागली. घरातला टॉयलेटचा नळ सुरू होता. खूप पाणी वाया जात होते. त्यामुळे पल्लविने आपल्या सासूला याची विचारणा केली. त्यावेळी सासू आणि पल्लवी या दोघींमध्ये वाद सुरू झाला. पल्लवीचे म्हणणे होते की, तुम्ही असे पाणी वाया घालवता म्हणून घरात भांडणे होतात. यावर वाद वाढला आणि तिने सासूच्या खांद्यावर, गळ्यावर आणि पोटावर कटरने वार केले. आपल्या आईला वाचवन्यासाठी मुलगा आणि त्याची पत्नी आणि मुलगी तिथे गेले तेव्हा पल्लवीने या तिघांना देखील रक्त बंबाळ केले. यात या चौघांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमसी घोष लेन पोलिसांनी तिथे धाव घेतली. यावेळी मृत देह पाहून त्यांनी पल्लविला ताब्यात घेतले. सध्या ते तिची चौकशी करत आहेत. यात ती मनो रुग्ण असल्याचे समजले आहे. मात्र तिने केलेल्या गुन्ह्याची तिने कबुली दिली आहे. त्यामुळे ती पोलिसांच्या अटकेत आहे. पोलिस डॉक्टरांशी संवाद साधून यावर योग्य तो निर्णय घेणार आहेत. अशी माहिती समजली आहे.