विशेष

पुन्हा एकदा तोच दुर्दैवी प्रकार! एका चुकीमुळे 5 वर्षीय चिमुकल्यांनी गमावला जीव.पालकांना सावध राहण्याची गरज.

संभाजीनगर : घरामध्ये एखादे लहान मूल असेल तर त्याची आपल्याला फार काळजी घ्यावी लागते. आपल्या लहान बाळांना इजा होतील, विपरीत घटना घडतील अशा गोष्टी कायम त्यांच्यापासून दूर ठेवाव्या लागतात. घरातील लोक लहान मुलाची फार काळजी घेत असतात.

 

परंतु काही वेळा खूप काळजी घेऊनही थोडेसे दुर्लक्ष झाल्याने काही विपरीत घटना घडत असतात. संभाजीनगर शहरातील अशीच एक मनाला जखम करणारी घटना घडली आहे. कार्यक्रमासाठी बनवलेल्या उकलेल्या वरणात पडून एका पाच वर्षाच्या मुलाचा जीव गेल्याची घटना घडली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार उकळलेल्या वरणात पडून ५ वर्षाचे मुल जखमी झाले होते. त्याला उपचार करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये घेऊन गेले होते. परंतु त्याच्यावर उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अमोल नानासाहेब शिंगोटे असे या कार्यक्रमासाठी वरण बनवण्यासाठी तयारी चालू होती. त्याच उकळत्या वरणात पडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. अमोल हा आपल्या आईसोबत हसनाबाद येथील नातेाइकांकड आला होता.

 

कार्यक्रमासाठी स्वयंपाक करण्याची तयारी घरामध्ये चालू होती. रात्रीच्या वेळी सगळे पाहूणे मंडळी बोलण्यात व्यस्त होती . त्यावेळी हा अमोल वरणाच्या भांड्याजवळ आला. आमोल चा तोल गेल्याने तो उकळत्या वरणात पडला. त्याला खूप भाजले होते. तो गंभीर जखमी झाला होता.

 

त्याच्या घरच्यांनी त्याला उपचार करण्यासाठी हॉस्पिटल मध्ये दाखल केले. परंतु त्याच्यावर उपचार चालू असतानाच त्याने आपला जीव सोडला. त्याच्या आईने डोळ्यादेखत मुलाचा मृत्यू झालेला पहिला होता. तीन आक्रोश करायला सुरुवात केली होती. अमोलच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला होता. इवल्याशा चिमुकल्या मुलाचा मृत्यू झालेला पाहून परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close