परीने घेतला प्रेक्षकांचा निरोप; प्रेक्षक वर्ग हळहळला

मुंबई |अनेक मोठे मोठे कलाकार छोट्या पडद्यावर काम करण्याचे उत्सुक असल्याचे समोर आले आहे तुझी माझी रेशीमगाठी या मालिकेतील श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांनी आपली भूमिका प्रेक्षकांपुढे मांडली. या मालिकेला भरपूर प्रतिसाद मिळाला. हे लक्षात घेता बॉलीवूडचे कलाकार ही पडद्यावर काम करण्यास उत्सुक आहेत.
त्याला आणखीन एक कारण कारणीभूत आहे. गेल्या दीड वर्षापासून चित्रपट निर्मिती बंद आहे. यामुळे बडे बडे कलाकार घरी बसून आहेत. बेरोजगारीचे प्रमाण वाढत आहे. मराठी कलाकार काम मिळण्यासाठी मराठी सिरीयल मध्ये काम करत आहेत. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहेरे यांना संकर्षण कराडे यांनी काम केले
गेल्या काही दिवसापासून तुझी माझी रेशीमगाठी या मालिकेमध्ये चढउतार चालू आहेत. पण या मालिकेमध्ये माहेराची भूमिका म्हणजेच परीची भूमिका प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली. भरभरून प्रेम दिल. या दिलेल्या प्रेमामुळे मायराला खूप प्रसिद्धी मिळाली. ते कामही कौतुक करण्यासारखे होते. कमी वयात चांगली प्रसिद्धी मिळणारे बालकलाकार म्हणून तिची ओळख होती. एवढी प्रसिद्ध झाली की ती कुठे राहते तिच्या आई-वडील कोणती काय करते याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा झाली.
सगळं चांगलं चालू असताना मात्र ही मालिका लवकरच निरोप घेणार असल्याच्या बातम्या समोर आल्या. याचं कारण म्हणजे प्रेक्षकांनी फिरवलेली पाठ, टीआरपी कमी. ही मालिका लवकरच बंद होणार आहे. मात्र यामधील कलाकार दिग्गज कलाकार म्हणून ओळखले जातात.
संकर्षण कराडे, तळपदे, प्रार्थना बेहेरे, मायरा, अनेक चित्रपटांच्या ऑफर देखील आहेत. हेच कारण आहे की काय जास्त मिळालेली प्रसिद्धी आणि कामाचा लोड म्हणून मालिका बंद करण्याची वेळ निर्माण त्यांवर आलेली आहे. संकर्षण कराडे दिलेल्या माहितीनुसार, परी ची भूमिका साकारणारी मायरा हिने शेवटच्या भागाचे नुकतेच चित्रीकरण पार पाडले. याच बातमीमुळे प्रेक्षक वर्ग हळहळला आहे. ही मालिका सुरू राहू द्या अशी प्रेषक वर्गानी भावपूर्ण वक्तव्य केला आहे