
बुलढाणाः बुलढाण्यात एक गंभीर घटना घडली आहे. पत्नीला कार शिकवायला गेलेल्या एकाची कार थेट विहिरीतच जाऊन कोसळली. दुपारी बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या कारमध्ये पती, पत्नी आणि मुलगी असे तिघेही होते. मात्र अचानक कार रेस झाली आणि नियंत्रण सुटल्यामुळे ती थेट विहिरीत कोसळली.
या घटनेत पत्नी आणि मुलीचा बुडून मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. या दरम्यान कार विहिरीत कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी तत्काळ सर्वांना वाचविण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे विहिरीच्या परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनाग्रस्त कारमधील पतीला क्रेनच्या सहाय्याने वाचविण्यात यश आलं असून त्याला विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं आहे. पतीला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून मुलगी आणि पत्नीचा अद्याप शोध लागलेला नाही.
एकाचा जीव वाचला:
त्या अपघातात अमोल मुरकुट हे खिडकीमधून कसेबसे बाहेर आले. आणि आपला जीव वाचवला. या अपघातामुळे बायको आणि मुलीचा मात्र जीव गमवावा लागला. अजूनही त्या दोघींचा मृतदेह सापडला नाही. मृतदेह शोधण्यासाठी अग्निशमन दल आणि पोलीस ताफा घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
तिघांपैकी वडील पोहून बाहेर पडले अशी माहिती मिळाली. परंतु मुलगी आणि पत्नी या कारसह विहिरीत बुडाल्या आहेत. गेल्या तीन तासांपासून बचाव कार्य सुरू आहे, मात्र अद्याप कार अजूनही बाहेर काढण्यात यश आलेले नाही. घटनास्थळी पोलीस , वैद्यकीय पथक व महसूल कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.