करमाळा तालुक्यातील मान्सून पूर्व पावसाची हजेरी

करमाळा | गेल्या काही दिवसांपासून शेतकरी राजा ज्याच्या प्रतिक्षेत बसला होता, असा मान्सून पूर्व पाऊस करमाळा तालुक्यात दाखल झाला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात दीलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून तालुक्यात उन्हाच्या कडाक्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.
मात्र मान्सून पूर्व झालेल्या पावसामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. त्यामुळे नागरिक सुखावले आहेत. येत्या काळात चांगला पाऊस हजेरी लावणार अशी शक्यता आहे.
सध्या तालुक्यात अनेक नाजूक पिके करण्यात आली आहे. मात्र उन्हाच्या तीव्रतेने त्या पिकावर थेट परिणाम होताना पाहायला मिळत आहे. मात्र मान्सून पूर्ण पावसानंतर उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. आणि यामुळे पिकांची हानी कमी होत.
त्यामुळे शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा मिळाला असल्याचे सांगितले जात आहे. शेतकरी वर्ग सुखवल्याचे देखील दिसत आहे. येत्या काळात तालुक्यात मोठ्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. त्यामुळे मेघराज कुठपर्यंत साथ देणार असा प्रश्न पडला आहे.