….तर राज्यात मास्कसक्ती केली जाईल – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचा सूचक विधान

जालना | महाराष्ट्र दिनानिमित्त जालना येथे माध्यमांशी बोलत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी महत्वपूर्ण विधान केले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राज्यातील मास्कसक्ती हटविण्यात आली आहे.
त्यामुळे पुन्हा मास्क सक्ती होणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर राजेश टोपे यांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. माध्यमांशी बोलताना टोपे म्हणाले की, जर राज्यात पुन्हा कोरोणा वाढला तर मास्क सक्ती करावी लागेल.
असे विधान राजेश टोपे यांनी केले आहे. मागील काही दिवसांपूर्वी टास्क फोर्सने देखील मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मास्क सक्ती संधर्भात अहवाल सादर केला आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा मास्क सक्ती होण्याची चिन्हे आहेत.
गेल्या काही दिवसांपासून देशात कोरोना पुन्हा वाढत असून त्यामुळे राज्य सरकार पुढील नियोजन करण्यासाठी अलर्ट झाल्याचे देखील दिसत आहे. मास्क संधर्भात मुख्यमंत्री कोणत्याही क्षणी घोषणा करण्याची शक्यता आहे.