राणा दा आणि पाठक बाई मोठ्या पडद्यावर पुन्हा एकदा येणार एकत्र, आगामी चित्रपटाचं नाव आलं समोर….

झी मराठी या वाहिनीने आतापर्यंत अनेक नवोदित कलाकारांना अभिनयाची संधी मिळवून दिली आहे. त्यातीलच एक अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमधून अक्षया आणि हार्दिक या दोघांनी खूप मोठी प्रसिद्धी मिळवली. त्यांच्या अभिनयाची चर्चा आजही केली जाते.
काही दिवसांपूर्वीच राणादा आणि पाठक बाई या दोघांनी साजऱ्या संगीतात त्यांचा साखरपुडा उरकला. या दोघांच्या साखरपुड्यानंतर अनेक प्रेक्षकांना सुखद धक्का बसला होता. अशाच आता हे दोघे सध्या लंडनमध्ये फिरताना दिसत आहेत. त्याचबरोबर माध्यमांवर अशी चर्चा सुरू आहे की हे दोघ आता कोर्टकचेरीमध्ये अडकत आहेत.
त्यांचा कोर्ट कचेरीमध्ये अडकण्याचे कारण देखील आता समोर आल आहे. अक्षया आणि हार्दिक हे दोघे लवकरच मोठ्या पडद्यावरती झळकणार आहेत. “फाईल नंबर 498 अ” या आगामी चित्रपटात ही जोडी पुन्हा एकदा एकत्र मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे.
कलम 498 अ या कलमांतर्गत हा चित्रपट आहे. यामध्ये एका मुलाची कहाणी दाखवण्यात आली आहे. हा मुलगा एका प्रकरणात गुंतलेला असतो. त्याच्यावरती 498 अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल केलेला असतो. हार्दिक आणि अक्षया या हे दोघेजण या चित्रपटात झळकणार असल्याने त्या दोघांचा कोर्टकचेरीशी संबंध असल्याचं म्हटलं जात होतं.
मात्र कोर्टकचेरीशी त्यांचा खऱ्या आयुष्यात नाही तर चित्रपटांमधनं संबंध जोडला जाणार आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेमध्ये अक्षया आणि हार्दिक या दोघांनी दमदार अभिने केला. या मालिकेमध्ये झळकण्या आधी देखील या दोघांनी बऱ्याच मालिका आणि चित्रपटांमध्ये छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या होत्या. मात्र मुख्य भूमिका असलेली ही या दोघांची पहिलीच मालिका होती.
“फाईल नंबर 498 अ”या चित्रपटाची निर्मिती आरती श्रीधर तावरे या करत आहेत. तसेच मल्हार गणेश हे या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात झालेली असून हे शूटिंग लंडनमध्ये सुरू आहे. त्यामुळेच अक्षया आणि हार्दिक हे दोघे देखील लंडनला गेले आहेत.