रविंद्र जडेजाचा चेन्नई सुपर किंगला रामराम?

चेन्नई | चेन्नई सुपर किंगचा सध्याचा सीझन मध्ये साजेशी कामगिरी बजावली नाही. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूवर त्याचे खापर फुटताना दिसत आहे. त्यामध्ये खेळाडूंना मोठ्या प्रमाणावर संघाने पैसे देऊन खरेदी केलेले असते रविंद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग ने १६ कोटी रुपये देऊन संघा मध्ये ठेवले होते.
महेंद्र सिंग धोनीने कर्णधार पदाचा राजीनामा देऊन रविंद्र जडेजाला चेन्नई सुपर किंग संघाचा कर्णधार पदाची जबाबदारी दिली होती. जडेजाला चेन्नई सुपर किंग टीमचा कर्णधार म्हणून साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यानंतर रविंद्र जडेजा कडून कर्णधार पदाची जबाबदारी कडून घेण्यात आली. व ती परत महेंद्र सिंग धोनीकडे सोपवण्यात आली.
धोनीची कर्णधार होताच एक वक्तव्य समोर आले होते की कोणालाही चमच्याने भारावून मोठा होता येत नसते त्याला आपली कामगिरी सिद्ध करावी लागते. हे धोनी जडेजाला उद्देशून तर बोलला नाही ना अशी चर्चा चाहते वर्गात रंगली होती.
ते होते न होतें तो पर्यंत आज चेन्नई सुपर किंग चे ऑफिसीअल इंस्टाग्राम पेज वरून रविंद्र जडेजाला उन्फोलो करण्यात आला होता. रविंद्र जडेजानेही चेन्नई सुपर किंगला उन्फॉलो केलंल दिसून आले.आत्ता सुत्रांच्या माहितीनुसार चेन्नई सुपर किंग आणि रविंद्र जडेजा या मध्ये काही तरी बिनसले असल्याची चर्चा होत आहे. अशातच रविंद्र जडेजा राहिलेल्या सामन्यातून माघार घेत असलेलं सुत्रांच्या माहितीनुसार सांगण्यात येते आहे