तीन निर्मात्यांबरोबर संबंध ठेवणे महागात पडले या प्रसिद्ध अभिनेत्रीला, आता जगत आहे एकटीने दुःखद आयुष्य….

मुंबई | पूनम ढिल्लन या अभिनेत्रीने तिच्या काळात बॉलीवुडवर मोठे राज्य केले. त्या काळी तिला चित्रपटात घेणे म्हणजे चित्रपट 100 टक्के हिट ठरणे असे समजले जात होते. आजही ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांमध्ये तिचा अभिनय दिसत असतो. तिच्या कारकिर्दीत तिने 80 पेक्षा जास्त चित्रपट केले आहेत. 1978 मध्ये तिने मिस इंडिया वल्ड ही स्पर्धा जिंकली होती.
त्यात त्रिशूल या पहिल्याच चित्रपटातून ती पडद्यावर आली. तिच्या कारकिर्दीत तिने नुरी, काला पथ्थर, रेड रोज, रोमान्स, दर्द, तरी मेहरबानीया, समंदर, कर्मा, नाम, मालामाल अशा अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. साल 2009 मध्ये ती बिग बॉसच्या घरात देखील आली होती. इथे तिने एक स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. या प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आयुष्यात अनेक वेगवेगळ्या घटना घडल्या ज्यांनी तिला खूप वेगळे अनुभव दिले. तिच्या आयुष्यात लग्ना व्याजतिरिक्त आजवर 4 वक्तींची नावे जोडली गेली आहेत.
यश चोप्रा यांच्या नुरी या चित्रपटात पुनम आणि रमेश तालावर होते. यात रमेशला पूनम बरोबर काम करायचे होते. त्याने प्रेम यांच्याकडे आपल्या मनातील गोष्ट सांगितली. पुढे काही दिवसांनी हे दोघे एकत्र राहू लागले. अभिनेत्रीच्या सांगण्यावरून रमेश यांनी तिच्यासाठी एक बंगला देखील विकत घेतला. मात्र जेव्हा पूनमला रमेश यांच्या मनातील गोष्ट समजली तेव्हा ती स्वतः त्याच्यापासून दूर गेली.
त्यानंतर काही काळ तिचे नाव यश चोप्रा बरोबर देखील जोडले गेले. माध्यमांनी तिला यावर अनेकवेळा प्रश्न विचारले. मात्र तिने नेहमीच हे खोटं असल्याचे सांगितले आहे. राज सिप्पी या निर्मात्या बरोबर देखील तिला अनेक वेळा स्पॉट केलं गेलं होतं. पूनम खरोखर राजच्या प्रेमात होती. मात्र राज विवाहित होता त्यामुळे तिने त्याच्या पासून देखील दूर राहणे पसंत केले. नंतर तिने अशोक ठाकरीया बरोबर विवाह केला.
या दोघांना दोन मुलं देखील आहेत. लग्न झाल्यानंतर काही दिवसांनी या दोघांचे मतभेद वाढले. तसेच तिला पतीचे विवाहबाह्य संबंध समजले त्यामुळे तिने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. 1997 मध्ये तीने पतीबरोबर घटस्फोट घेतला. त्यानंतर आपल्या मुलांचे तिने एकटीने संगोपन केले. आज देखील ती अभिनय क्षेत्रात सक्रिय दिसते. काही कार्यक्रम आणि मालिकांमध्ये तिची झलक पाहायला मिळते.