दुःखद : ‘देवा निष्पाप बाळाची काय रे चूक’, संभाजीनगर मध्ये आईच्या निधनानंतर चिमुकला आईला शोधत रस्त्यावर आला, अन् वाचुन डोळयात पाणी येईल

संभाजीनगर : हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असतानाच एका स्त्री चा मृत्यू झाला. सगळे तिच्या अंत्यविधीच्या तयारीत होते. या सगळ्या गडबडीत मृत महिलेचा ३ वर्षाचा चिमुरडा हा आईला शोधायला घराबाहेर पडला. तो आईला रस्त्याने शोधत राहिला जात असतां रस्त्यात पडुन जखमी देखील झाला पण त्याने आईचा शोध घेणे चालूच ठेवले.या जखमी लेकराला पाहून दोन बायकांनी पोलिसांना फोन केला आणि त्यांच्या ताब्यात दिले. परंतु पोलिसांनी याबद्द्ल ऐकले तेव्हा त्यांच्या देखील डोळ्यात पाणी आले.
ही घटना संभाजीनगर मधील जवाहर कॉलनी या ठिकाणी घडली. मिळालेल्या माहितीनुसार गिरिराज सोनी हे मध्यप्रदेश मधून औरंगाबाद मध्ये आपल्या बायकोला दवाखान्यात घेऊन आले होते. त्याच्या सोबत त्याचा तीन वर्षाचा निखिल हा मुलगा देखील होता. परंतु या गिरिराज सोनी याची पत्नी उपचार चालू असतानाच निधन पावली. १६ जानेवारीला पत्नी मरण पावली. गिरिराज ची मृत पत्नीला इंदोर ला अंत्य संस्कार करण्या ऐवजी तिचा अंत्य संस्कार हा औरंगाबाद मधील नातेवाईक यांच्यातच करण्याचे ठरवले.
सर्व नातेवाईक आणि गिरिराज सोनी हा अंत्य विधीच्या गडबडीत असतानाच त्यांचा तीन वर्षाचा चिमुरडा हा आईला शोधण्यासाठी रस्त्यावर आला . परंतु त्याला आई ही कुठेच दिसत नव्हती. या जगमधून त्याची आई नाहीशी झाली होती. मुलगा घराबाहेर पडल्याचे घरी असलेल्या कोणाच्या लक्षात आले नाही. तो लहान चिमुरडा रस्त्याने आईला शोध धडपडत गेला,रस्त्याने त्याचे डोके फुटले, पूर्ण तो रक्तबंबाळ झाला.त्या दोन महिलांनी पोलिसानं फोन करू या मुलाची माहिती दिली.पोलीस त्या चिमुरड्या मुलाकडे आले.
त्यांनी या मुलाच्या पालकांचा शोध घेण्यास सुरुवात केली. इकडे गिरिराज सोनी हे अंत्यसंस्कार करून परत आले. त्यांना मुलगा दिसेनासा झाला त्यामुळे त्यानेही मुलाला शोधायला सुरुवात केली. पोलिसांनी खूप शोध घेतल्यानंतर पालकांचा शोध लागला. चिमुकल्या निखिल ची पालकांकडून कहाणी ऐकल्यानंतर पोलिसांच्या पोलिसांच्या ही डोळ्यात पाणी आलं. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.