विशेष

दुःखद ! मनोज वाजपेयी यांच्या आईचे निधन वयाच्या 80 वर्षी घेतला अखेरचा श्वास

Sad! Manoj Vajpayee's mother passed away at the age of 80 and breathed her last

मुंबई : वर्ष २०२२ हे बॉलिवूड साठी , फिल्मी जगतासाठी तसेच अभिनय क्षेत्रातील दिग्गज कलाकार यांच्यासाठी अतिशय दुःखद गेले आहे. प्रत्येक महिन्यात एक तरी कलाकार गेल्याचे सांगितले जात आहे. एक एक करून असे सर्वच प्रसिद्ध कलाकार निधन पावले आहेत.त्याचे दुःख विसरत नाही तोपर्यंत काल एक ताजी खबर पुढे आली आहे.

 

बॉलिवूड क्षेत्रात काम करत असलेले प्रसिद्ध कलाकार आणि अभिनेते मनोज वाजपेयी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ८ डिसेंबर रोजी त्यांच्या आईचे निधन झाले आहे . त्या दवाखान्यात उपचार घेत होत्या. परंतु वयानुसार त्याच्या शरीराने त्यांना साथ दिली नाही.

 

मनोज वाजपेयी यांनी आपल्या धमकदार अभिनयाने कलाविश्र्वात आपले साम्राज्य निर्माण केले होते. त्यांना कोणाच्याही वशिल्याची गरज पडली नाही. मनोज यांनी अनेक चित्रपटात काम केले होते. अशा या दिग्गज अभिनेत्यांसोबत एक वाईट अशी बातमी आली आहे. त्यांच्या आई गीता वाजपेयी या दवाखान्यात उपचार घेत होत्या.

 

त्यांचे वय ८० वर्ष झाले होते. गीता वाजपेयी यांची तब्येत बिघडली होती त्यामुळे गीता यांना दवाखान्यात दाखल केले होते. परंतु त्यांनी उपचार चालू असतानाच काल सकाळी गीता यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या अनेक महिन्यांपसून गीता यांच्यावर हॉस्पिटल मध्ये उपचार चालू होते. त्यांच्या तब्येतीच्या रिपोर्टमध्ये सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले होते. परंतु परवा अचानक त्यांची तब्येत बिघडली. आणि गीता यांचे निधन झाले.

 

गेल्या वर्षीच मनोज वाजपेयी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. ते दुःख संपायच्या अगोदरच त्यांच्या आईचे निधन झाले. आईने शिकवलेल्या गोष्टी मनोज वाजपेयी कायम लक्षात ठेवत असत. वडीलांच्या निधनानंतर त्यांच्या आईचे हि निधन झाल्याने मनोज वाजपेयी यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.

 

जो यशस्वी होत नाही त्याला कधीच कमी समजू नये ही शिकवण मनोज यांना त्यांच्या आईने दिली होती.ते कधीच विसरत नाहीत.. मनोज हा आपल्या आईच्या जाण्याने अतिशय दुःखी झाला होता. मनोज वाजपेयी यांच्या आईवडिलांचे जाण्याने दुःखी झाला होता. मनोज यांच्यावर त्यांच्या आईवडिलांच्या जण्यान मनोजच्या डोक्यावरचा हात निघाला होता.

 

एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या आईच्या जाण्याने अभिनय क्षेत्रात ही शोककळा पसरली आहे. मनोज च्या चाहत्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close