इतर

दुःखद बातमी|रक्षाबंधनच्या दिवशी २५ ते ३० बहिणीचा मृत्यू, ५० जणांची नाव बुडाल्याने मिळाली जलसमाधी, शोधकार्य सुरू

लखनौ | रक्षाबंधनच्या दिवशीच एक मोठी दुर्घटना घडली आहे. यामध्ये २५ ते ३० महिला आपल्या माहेरी जात असताना आपल्या मुलांसह पाण्यात बुडाल्या आहेत. त्यांना जलसमाधी आली आहे. उत्तरप्रदेश येतील बांद्याहून फतेहपूरला जाणाऱ्या नावेला हा अपघात घातला आहे. यात अनेक महिला अनेक लहान मुलांना जलसमाधी मिळाली आहे. यामुळे सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. यात एकूण ४० ते ५० प्रवाशी होते. सध्या आसपासच्या परिसरातील व्यक्तींनी मदत कार्य सुरू केले आहे.

 

यावेळी अनेक महिला रक्षाबंधन साजरी करण्यासाठी माहेरी निघाल्या होत्या. मात्र यंदाची रक्षाबंधन त्यांच्या जीवावर बेतली आहे. नाव यमुनेच्या मध्या भागी आल्यावर पटली झाली. यावेळी अनेक व्यक्ती पोहत आपला जीव वाचवू लागले. मात्र महिला आणि मुलांना पोहता येत नसल्याने त्यांना जलसमाधी मिळाली आहे.

 

यातील एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, ” मी माझ्या पत्नी आणि मुलांबरोबर या नावेत बसलो होतो. नाव जेव्हा किनारी होती तेव्हा तिथे फक्त एकच नाव होती. ३ नंतर गर्दी वाढली त्यामुळे आम्ही देखील याच नावेने जाण्याचा निर्णय घेतला. नाव जेव्हा यमुना नदीच्या मध्या भागी आली तेव्हा हलू लागली. यात अनेकजण आपल्या दुचाकी घेऊन बसले होते. त्यामुळे सर्व जण धावपळ करू लागले. यामुळे नाव एका बाजूने कलंडली. यात बाकीच्या नाव बुडत असलेल्या व्यक्तींना वाचवत होत्या. मी देखील एका नावेवर आलो. मात्र माझी पत्नी आणि मुलं वाचू शकली नाहीत.”

 

आणखीन एका व्यक्तीने सांगितले की, ” नावेत ५० जण होते. मी माझ्या पत्नीला समधराला सोडले आणि मी परत माझ्या बहिणीकडे बरैचीला निघालो. यावेळी माझी दुचाकी देखील मी नावेत ठेवली. मी कसाबसा वाचलो मात्र दुचाकी बुडाली.”

 

नावेत ४० ते ५० जण होते. त्यातील १५ व्यक्तींना वाचवण्यात आले आहे. मात्र २५ ते ३० व्यक्ती बेपत्ता आहेत. तसेच चार जणांचे मृत देह मिळाले आहेत. ही नाव असोथर घाटावर जात होती. यावेळी सामगरा गावातील व्यक्ती या नावेत बसल्या होत्या. नाव यमुना नदीच्या मध्या भागी पलटी झाली. या घटनेनं सगळीकडे शोकाकुल वातावरण पसरले आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close