क्रीडामनोरंजन

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा, भारतीय संघातील या नवीन खेळाडूवर करते प्रेम, पुरावे आले समोर…

मुंबई | भारतीय संघाचा युवा खेळाडू शुभम गिल हा त्याच्या खेळामुळे तसेच त्याच्या लुकमुळे देखील नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अफेरच्या देखील अनेक गोष्टींची चर्चा होत असते. अशात आता पुन्हा एकदा तो त्याच्या लवलाईफमुळे चर्चेत आला आहे. यावेळी त्याचं नाव सचिन तेंडुलकरच्या मुलीशी जोडलं जात आहे.

सचिनची मुलगी सारा तेंडुलकर ही एक मॉडेल आहे. ती दिसायला खूपच सुंदर आहे. तर आता सध्या क्रिकेटर शुभम गिल बरोबर तिचं नाव जोडलं जातं आहे. या दोघांमध्ये मैत्री आहे. तसेच अनेकदा दोघांना एकत्र स्पॉट देखील केलं आहे. मात्र दोघेही आपल्या नात्याबद्दल उघडपणे बोलण टाळतात.

तसं असलं तरी ते दोघेही इंस्टाग्राम अकाऊंटवर एकमेकांना फॉलो करतात. तसेच वेगवेगळ्या पोस्टवर देखील एकमेकांना कमेंट करत असतात. या दोघांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना देखील फॉलो केलं आहे. शुभमने साराचे आई वडील यांना फॉलो केलं आहे. तर साराने शुभमच्या बहिणींना फॉलो केलं आहे. शुभामला दोन बहिणी आहेत. सेहनील गिल आणि सिरमत गिल अशी त्यांची नावं आहेत.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शुभम कडून भरपूर अपेक्षा होत्या. मात्र त्याला या अपेक्षा पूर्ण करता आल्या नाही.
शुभम गिल हा सध्या भारतीय संघासह इंग्लंड दौऱ्यावर आहे. शुभम हा दिसायला खूप हँडसम आहे. त्यामुळे अनेक मुली त्याच्या लूकवर फिदा असतात. मात्र त्याला सचिनची मुलगी सारा आवडते. हे दोघे एकमेकांना सतत ट्वीट देखील करत असतात. सध्या या दोघांच्या बातम्या खूप गाजत आहेत.

नुकत्याच काही दिवसांपूर्वी शुभम गीलने असं म्हटलं होतं की तो सिंगल आहे. युजर्स बरोबर चॅट करत कमेंटमधून त्याने संवाद साधला होता. त्यामधून तो सिंगल असल्याचे समजले होते. मात्र हे तो खोट सांगत असल्याचं त्याचे चाहते म्हणत आहेत. कारण त्या नंतर देखील बऱ्याचदा सारा आणि शुभम एकमेकांना डेट करताना दिसले होते.

सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर हिने तिच्या कारकिर्दीसाठी मनोरंजन हे क्षेत्र निवडले आहे. नुकतेच तिने एक फोटोशूट केले होते. यातील काही फोटो तिने सोशल मीडियावर अपलोड ही केले होते. त्यावेळी तिच्या ग्लॅमरलूकमुळे ती खूप प्रकाशझोतात आली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close