कोरोनाची सुई आणि शाळेची खऱ्या अर्थाने पहिल्यांदा वाजलेली घंटा

पुणे | कोरोना महामारीचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला. अशात यामुळे सर्वात जास्त नुकसान हे शिक्षण शेत्राचे झाले आहे. अनेक विद्यार्थी यामुळे अभ्यासापासून दुरावले. अशात काल १५ जून पासून राज्यात ९ वी आणि १० वीच्या विद्यार्थांसाठी खऱ्या अर्थानं शाळेची पहिली घंटा वाजली.
राज्य भारत काल शाळेत आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे फुलं उधळत तर कुठे ढोल ताशे वाजवत स्वागत करण्यात आले. त्यामुळे सर्व विद्यार्थी खूप आनंदी होते. कोरोना महामारीनंतर अनलॉक झाल्यावरचं सर्व शाळा सुरू झाल्या होत्या. मात्र त्या मध्येच आर्धे वर्ष उलटून गेल्यावर सुरू झाल्या. यामध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा देखील ऑफलाईन घेण्यात आल्या. पण त्या जेवढा अभ्यासक्रम शिकवून झाला आहे. त्यावरच घेण्यात आल्या.
त्यामुळे आता अगदी कोरोनाचे सावट येण्या आधी जशा शाळा सुरू होत्या तशा पद्धतीने काल शाळा सुरू झाल्या. शाळेतला हा पहिला दिवस सर्वांना छान वाटावा म्हणून प्रत्येक शाळेने विद्यार्थ्यांचे मोठ्या दिमाखात स्वागत केले. आता परत पूर्वी सारखी शाळा भरलेली दिसेल.
कोरोना महामारीमुळे सर्व काही बंद होते. शाळा, कॉलेज देखील बंद होते. यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचे नुकसान झाले. शासनाच्या आदेशानुसार सर्व शाळांनी ऑनलाईन पद्धतीने शिकवायला सुरुवात केली होती. मात्र यात विद्यार्थ्यांना खूप अडचणी येत होत्या. तसेच बरेच विद्यार्थि अभ्यासासाठी फोन घ्यायचे आणि त्यावर गेम खेळत बसायचे. गेमच्या आहारी जाणून अनेक विद्यार्थ्यांनी आपला जीव गमवल्याच्या बातम्या देखील समोर येत होत्या.
अशात एकीकडे अभ्यास न करणारे विद्यार्थी होते. तर दुसरीकडे अभ्यासासाठी रडत बसणारे देखील अनेक विद्यार्थी होते. त्यातील काहींना शिकण्याची इच्छा होती. मात्र त्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवलेले समजत नव्हते. तर काही पालकांची आर्थिक परिस्थिती ठीक नसल्याने अनेक विद्यार्थी अभ्यासापसून वंचित राहिले. अशात काहींनी आपल्या आई बाबांकडे अभ्यासासाठी फोन घेऊन देण्याचा हट्ट देखील केला. या काळात फोन घेऊन न दिल्याने एका विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना देखील समोर आली होती.
शहरात पाहिलं तर जितकं गरीब कुटुंब तितकाच महागडा फोन त्या घरात असं चित्र आहे. त्यामुळे शहरात ऑलाइन शिक्षणाचा फारसा त्रास विद्यार्थ्यांना झाला नाही. मात्र गावी खेड्या पाड्यातील आणि अती दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना याचा खूप मोठा त्रास सहन करावा लागला. एकतर अशा ठिकाणी पालक आधीच आपल्या मुलाला शाळेत पाठवत नाहीत. अशात शासकीय शाळांमध्ये या मुलांना मोफत शिक्षण मिळते म्हणून ते तिथे शिकतात. परिस्थिती नसल्याने या मुलांना ऑनलाईन शिक्षण मिळाले नाही. यामुळे अनेक विद्यार्थि मागे राहिले. ज्या विद्यार्थ्यांनी हट्ट करून फोन मिळवला त्यांना देखील याचा फारसा फायदा झाला नाही. कारण गावात नेटवर्कची नुसती बोंबाबोंब. अशात काही विद्यार्थी नेटवर्क साठी अगदी तासंतास झाडावर देखील बसून राहत होते.
कधी तरी नेटवर्क येईल आणि आमचा अभ्यास होईल अशी आशा या मुलांमध्ये होती. अशात आता शाळा सुरू झाल्याने जे जे विद्यार्थी मागे राहिले होते त्यांचा देखील आता विकास होणार आहे. शाळा बंद असताना शासनाने वर्षाच्यामध्ये शाळा सुरू केल्या शिवाय ऑफलाईन परीक्षा देखील घेतल्या याचा त्रास अनेक विद्यार्थ्यांना झाला. कारण बरीच मुलं परीक्षेत नापास झाले. एवढे दिवस ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देण्याची सवय झाली होती. त्यात १०० मधला एकही विद्यार्थी असा नसेल ज्याने ऑनलाईन परीक्षा कॉपी न करता दिली आहे. त्यामुळे अचानक ऑफलाईन परीक्षा देण्याची विद्यार्थ्यांची तयारी नव्हती.
यामध्ये नेहमीच मिम्सवर झळकणारा हिंदुस्तानी भाऊ १० वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या बाजूने उभा राहिलेला दिसला. मात्र या भाऊने भलताच गोंधळ घातला. चक्क शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याबाहेर विद्यार्थ्यांना आंदोलन करण्यासाठी त्याने प्रोत्साहन दिल. त्याच्या या मूर्खपणामुळे त्याला जेलची हवा देखील खावी लागली.