मनोरंजन

प्रसिद्ध अभिनेत्याचे शेवटचे दिवस पाहून डोळयात पाणी येईल; शेवटच्या दिवशी खायला….

दिल्ली | बॉलीवूडमध्ये असे खूप कमी कलाकार आहेत ज्यांनी अर्धवट वयामध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. मात्र तरीदेखील त्यांनी यशाचे उंच शिखर घातले. बॉलीवूडमध्ये करिअर करत असताना मोठे नाव कमावण्यात अनेक कलाकारांचे पूर्ण आयुष्य निघून जाते. ज्यावेळी अनेक नवीन तरुण कलाकार बॉलीवूडमध्ये येतात त्यावेळी त्यांना स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी बराच काळ लागतो. खूप कमी कलाकारांचे पहिले चित्रपट सुपरहिट ठरतात. अशात अर्धवट वयामध्ये बॉलीवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर यशाचा शिखर गाठणे ही खरंच मोठी कौतुकास्पद बाब आहे. याच कौतुकाचे मानकरी ठरलेले आहेत ए.के. हंगल

हंगल यांनी त्यांच्या कारकीर्दीत शोले सारख्या चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने चार चाँद लावले होते. त्यांनी या चित्रपटांमध्ये एका अंध व्यक्तीची म्हणजेच रहिम चाचाची भूमिका साकारली होती. रहीम चाचा या पात्राने त्यांना खूप पुढे नेले. एके हंगल यांचे पूर्ण नाव अवतार किशन हंगल असे आहे. सियाकोटच्या एका कश्मीरी पंडित कुटुंबात त्यांचा जन्म झाला.

बालपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती मात्र सुरुवातीच्या काळात त्यांनी शिंपी हा व्यवसाय केला होता. त्यानंतर स्वातंत्र्य लढ्यामध्ये 1929 ते 1947 या काळादरम्यान ते सक्रिय राहिले. यादरम्यान त्यांनी त्यांच्या अभिनयाची कला देखील जोपासली. साल 1936 मध्ये त्यांनी पेशावार येथील एका संगीत मंडळातील नाटकांमध्ये सहभाग घेतला. त्यानंतर काही काळाने त्यांच्या वडिलांचे निधन झाले त्यावेळी ते कराचीमध्ये स्थायिक झाले.

भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय असताना त्यांना 1947 ते 1949 या कालावधीत तुरुंगवास देखील भोगावा लागला. दरम्यान 1949 रोजी झालेल्या फाळणी नंतर ते मुंबईमध्ये परतले. त्यानंतर त्यांनी संपूर्ण वेळ आपल्या अभिनयाच्या कारकीर्दीसाठी दिला. बलराज सहानी आणि कैफ आजमी यांच्याबरोबर आयपीटीए या थिएटरमध्ये ते शामिल झाले.

वयाच्या 52 व्या वर्षी त्यांनी बॉलीवूडमध्ये आपले पहिले पाऊल ठेवले. तिसरी कसम हा त्यांचा प्रथम चित्रपट बासू भट्टाचार्य यांच्या दिग्दर्शनात बनला होता. 1966 साली या चित्रपटामध्ये काम करत असतानाच त्यांचा शागीर्द हा दुसरा चित्रपट देखील प्रदर्शित झाला. 52 व्या वयात त्यांनी चित्रपट सृष्टीत पदार्पण केल्याने त्यांना जास्त करून मुख्य हिरोजी भूमिका मिळाली नाही. चित्रपटांमध्ये हिरोच्या काकाची आणि भावाची भूमिका त्यांनी बऱ्याचदा निभावली. काही चित्रपटांमध्ये ते वडिलांच्या भूमिकेत देखील दिसले.

त्यांच्या कारकिर्दीतील नरम गरम, गुड्डी, बालिका वधू, छुपा रुस्तम, चीचोर, आंधी, तपस्या, कोरा कागज, बावरर्ची, अवतार, आईना हे काही प्रचंड गाजलेले चित्रपट आहेत यामध्ये शोले हे नाव आग्रहाने नमूद करावे लागेल. तेरे मेरे सपने आणि लगान या चित्रपटांमध्ये देखील त्यांनी भारदस्त भूमिका बजावली. 1970 ते 1990 पर्यंत अशी एकूण तीन दशके त्यांनी बॉलीवूडमध्ये अभिनय करत घालवली.

बॉलीवूड बरोबरच त्यांनी मालिका विश्वामध्ये देखील काम केले. अंधार ही त्यांची पहिली मालिका होती. द लास्ट व्हॉइसरॉय या मालिकेमध्ये त्यांनी वल्लभभाई पटेल यांची भूमिका साकारली. त्यानंतर ते जीवन रेखा, जबान संभालके, बॉम्बे ब्ल्यू, आहट, हॉटेल किंगस्टन अशा मालिकांमध्ये झळकले. मधुबाला एक इश्क एक जुनून ही त्यांच्या कारकिर्दीतील सर्वात शेवटची मालिका ठरली.

आपल्या अभिनयाच्या कारकीर्दी त्यांनी प्रचंड प्रसिद्धी आणि संपत्ती कमावली होती मात्र शेवटच्या दिवसांमध्ये त्यांच्याकडे उपचारांसाठी पैसे नव्हते. सुरुवातीला त्यांच्या पाठीचे हाड तुटल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान असे निदर्शनास आले की त्यांचे हृदय देखील व्यवस्थित काम करत नाही. या सर्व परिस्थितीत ऑपरेशन साठी त्यांना अमिताभ बच्चन यांनी मदत केली होती. तसेच बॉलीवूडमधील अन्य काही व्यक्तींनी देखील त्यांना पैशांची मदत केली होती. आपल्या कारकीर्दीत तब्बल 225 चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या या दिग्गज अभिनेत्याचा 26 ऑगस्ट 2012 रोजी दुर्दैवी मृत्यू झाला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close