शाहरूखने खाल्ला मा’र; कारण जाणून धक्काच बसेल

मुंबई| शाहरुख खानने आजवर बॉलीवूडमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याच्या हरहुन्नरी अभिनयाने आज त्याला बॉलीवूडचा किंग खान म्हणून देखील ओळखले जाते. मात्र किंग खान बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास फार कठीण होता. त्याच्या संघर्षाच्या प्रवासामध्ये अनेक रंजक किस्से त्याच्याबरोबर घडले. यातीलच एक किस्सा आज जाणून घेणार आहोत.
शाहरुख खान हा मूळचा मुंबईचा नाही मात्र आज आख्या मुंबईमध्ये त्याचं घर देखील एक पर्यटन स्थळ झालं आहे असं म्हणायला हरकत नाही. मुंबई दर्शनासाठी येणारी प्रत्येक व्यक्ती त्यांच्या घराकडे देखील नेहमी डोकावते. मात्र त्याने जेव्हा मुंबईत पाहिले पाऊल ठेवले होते त्याच वेळी एका महिलेने त्याच्या कानामागे सणसणीत आवाज काढला होता. हा प्रसंग त्याने एका मुलाखतीत स्वतः सांगितला होता. यामुळे आजही त्याला ट्रेन लोकल आणि ती बाई चांगलीच आठवते.
कारण यावेळी तो पहिल्यांदाच मुंबईत आला होता. पहिल्यांदाच मुंबई पाहिली पहिल्यांदाच ट्रेन देखील पाहिली आणि पहिल्यांदाच एका बाईने त्याच्या काशीलाच लगावली. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी सांगितले होते. त्यावेळी तो म्हणाला होता की, ” मी दिल्लीवरून मुंबईला पहिल्यांदाच येत होतो. त्यावेळी दिल्लीहून मी तिकीट काढून आलो होतो.
मुंबईत दाखल झाल्यावर ती एका महिलेला मी माझी सीट बसायला दिली. तसेच तिला सांगितले की, ही माझी सेट आहे याचे मी पैसे भरलेत. मी ही फक्त तुम्हाला बसायला देत आहे. तुम्ही तुमच्या ओळखीच्या इतर व्यक्तींना इथे बसू नका.” ट्रेनमध्ये असा प्रकार कधीच चालत नाही. ज्या व्यक्तीला सीट मिळेल त्या व्यक्तीने तिथे बसायचे असते. मात्र या लोकल ट्रेन विषयी शाहरुखला काहीच माहिती नव्हती.
पुढे तो म्हणाला की, ” मी असे म्हटल्यावर त्या बाईने जोरदार माझ्या कानामागे लागवली. तिने मारलेली ती कांशीलात मला अजूनही लक्षात आहे.” असे शाहरुख म्हणाला. शाहरुख खानने आतापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. 90 च्या दशकातत्याचे अनेक रोमँटिक चित्रपट हिट ठरलेत. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा त्याचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खूप हिट ठरला. आजही अनेक चाहते त्याचा हा चित्रपट आवडीने पाहतात.