धक्कादायक! २ वर्षीय चिमुकलीला राग अनावर; सापाचे केले दाताने दोन तुकडे, अन् पुढे जे झालं ते..

दिल्ली | साप दिसल्या बरोबर अनेकांना पळता भुई थोडी होते. बऱ्याच वेळेस साप दिसल्यावर लोक सर्प मित्रांना बोलावून त्यांना जीवन दान देतात मात्र तूर्किमधील ही घटना ऐकून तुमच्याही काळजात धडकी भरेल.एका दोन वर्षांच्या मुलीने सापाला चक्क आपलं खेळणं बनवलं. ज्यावेळी सापाने तिला दंश केला तेव्हा ती खूप रागावली. त्यामुळे तिने सापाचा देखील चावा घेतला. या मुळे मुलीला रुग्णालयात दाखल केले आहे.
माध्यमांवर आलेल्या माहितीनुसार तुर्की मधील एका ठिकाणी दोन वर्षांची मुलगी घरात एकटी होती. तिचे बाबा कामाला गेले होते. यावेळी ती खेळत होती. तिच्या आजूबाजूला खूप खेळणी होती. याच खेळण्यात तिला जिवंत साप दिसला.तिने त्याला हातात घेऊन त्याच्या बरोबर खेळायला सुरुवात केली. यावेळी सापाने तिच्या गालाला आणि ओठाला चावा घेतला. याचा त्या मुलीला इतका राग आला की, तिने जे केले त्याने सगळेच थक्क राहिले. तिने दंश केलेल्या सापाला कचा कच चावले.
यावेळी तिचा आवाज ऐकून शेजारी तिथे जमा झाले. त्यांनी पाहिले तेव्हा ती सापाला चावत होती. तिला पाहून सगळेच भयभीत झाले. सगळ्यांनी तिच्या हातून साप बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र तोवर उशीर झाला होता.तुम्हाला आता वाटले असेल की, मुलीचे काही बरे वाईट झाले की काय, मात्र तिची काळजी करण्याचे काहीच कारण नाही. कारण आर्धा मीटर लांब असलेल्या या सापाचे चिमुकलिने तिच्या दातांनी दोन तुकडे केले आहेत.
यावेळी नागरिकांनी तिला तात्काळ रुग्णालयात नेले. सध्या ती ठीक असून लवकरच तिला घरी सोडले जाणार आहे. मात्र यात सापाचा जीव गेला आहे. या सापाचे तिने दोन तुकडे केल्याने साप मेला आहे.या घटनेची माहिती तिचे बाबा घरी आल्यावर त्यांना समजली. यावेळी मुलीचे धाडस पाहून त्यांनी तिची काळजी व्यक्त करत तिचे कौतुक देखील केले. या घटनेची संपूर्ण परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.