धक्कादयक | लग्नाच्या एक वर्षा आधीच पतीनेच केला पत्नीचा घात; थरकाप उडवणारी घटणा

सांगली | आटपाडी तालुक्यातील खरसुंडी येथे एका नवविवाहित मुलीचा खून झाल्याची तक्रार तिच्या माहेरच्या मंडळींनी दाखल केली आहे. यशोदा आकाश शिंदे (22) असे मृत विवाहितेचे नाव आहे. आकाश आनंद शिंदे (24) बरोबर तिचे लग्न झाले होते. लग्नानंतर काही दिवसांनी आकाश तिला मारहाण आणि शिवीगाळ करू लागला होता. याला कंटाळून यशोदा तिच्या माहेरी गेली होती. मात्र आकाश तिथे देखील तिला परत आणण्यासाठी जात होता.
मात्र माहेरची मंडळी तिला पाठवत नव्हते. कारण आकाश हा पूर्णतः दारूच्या आहारी गेला होता. तो मुंबईमध्ये काम शोधायचे आहे म्हणुन पैसे घ्यायचा आणि दारू पिऊन घरी यायचा. घरी आल्यावर तो यशोदाला खूप मारहाण आणि शिवीगाळ करत होता. त्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी मुलीला स्वतः जवळ ठेवले होते. मात्र दोन ते तीन दिवसांपूर्वी आजी आजारी आहे असे सांगून तो तिला सासरी घेऊन आला. इथे आल्यावर त्याने तिचा खून केल्याची तक्रार यशोदाच्या कुटुंबीयांनी केली आहे.
गुरुवारी रात्री 11.30 वाजता गावातील एका मित्राने यशोदा विषयी ही माहिती दिली. आकाश बरोबर तिचे लग्न होऊन जेमतेम 1 वर्ष सुद्धा झाले नव्हते. या घटनेनं तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. तिचे कुटुंबीय पती कडून तिला होत असलेल्या त्रासापासून तिचा बचाव व्हावा म्हणून तिला माहेरी घेऊन आले होते. मात्र आकाशने आजी आजरी असल्याचे खोटे कारण सांगत तिला घरी नेले आणि तिचा जीव घेतला. आता कुटुंबीय मोठ्या दुःखात आहेत तसेच आमच्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी करत आहेत.
खरसूंडी येथील एका गावात तो आणि यशोदा राहत होते. आटपाडी पोलीस ठाण्यात सदर तक्रार नोंदवली आहे. मुलीच्या माहेरच्या एका व्यक्तीला तिने आत्महत्या केल्याची माहिती मिळाली. यावेळी सांगण्यात आले होते की तिने गळफास घेतला आहे. त्यामुळे कुटुंबीयांनी लगेचच यशोदाच्या सासरी धाव घेतली.
त्यावेळी आकाश तिच्या तोंडावर पाणी मारत तिला फीट आल्याचे सांगत होता. त्यामुळे कुटुंबीयांनी लगेचच तिला दवाखान्यात दाखल केले. खरसुंडी व भिवघाट येथील एका रुग्णालयात तिला दाखल करण्यात आले होते. मात्र इथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. त्यामुळे यशोदाच्या कुटुंबीयांचे असं म्हणणे आहे की आकाशने तिचा खून केला आहे. सदर घटनेत पोलीस अधिक तपास करत आहेत.