धक्कादायक ! भावाच्या निधनाची बातमी समजतात बहिणीने देखील सोडले प्राण; मनाला चटका लावणारी घटना

वर्धा | बहिण भावाचं नातं हे किती अतूट आणि अनमोल असतं हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. लहान असताना किंवा मोठे झाल्यावर देखील बहिण भाऊ एकत्र आले की एकमेकांबरोबर मजा मस्ती आणि कधीकधी मारामारी करतानाही दिसतात. मात्र या सर्वांमध्ये ही एक वेगळीच मजा असते. प्रत्येक बहिण भाऊ एकमेकांबरोबर जितकी मजा मस्ती करतात तितकेच ते एकमेकांवर प्रेम करत असतात. रक्षाबंधन, भाऊबीज अशा सणांनिमित्त बहिण भावाचे प्रेम सर्वजण व्यक्त करत असतात.
घरामध्ये बहिण जर मोठी असेल तर ती आपल्या लहान भावाच्या पाठीशी कायमच खंबीरपणे उभी राहते. त्याच्या वाटेत एखादे संकट आल्यास ताई ते स्वतःवरही ओढून घ्यायला पुढे मागे बघत नाही. काही झाले तरी ती आपल्या भावाच्या पाठीशी सावली प्रमाणे असते. अशात बहिण भावाच्या याच घट्ट नात्यात एक हृदय द्रावक घटना घडली आहे. या घटनेमध्ये भावाचे निधन झाले आहे हे समजल्यामुळे बहिणीने देखील स्वतःचे प्राण सोडून दिलेत.
इकबाल किफायद शेख हा 35 वर्षीय तरुण वर्धा येथील बडी मशिद परिसरात राहत होता. नागपूरमध्ये तो प्रॉडक्ट मार्केटिंगचे काम करायचा. मंगळवारी तो सिंदी रेल्वे येथे येण्यास निघाला होता. यावेळी धवलपेट पुलावर त्याची गाडी पोहोचली असता एका दुसऱ्या गाडीने त्याला धडक दिली. यामध्ये तो जागीच खाली पडला. अपघातात त्याला खूप जास्त मार लागल्याने त्याचे निधन झाले. त्याच्या पश्चात एक वृद्ध आई एक बहीण आणि भाऊ असा परिवार होता.
त्याची 40 वर्षीय बहीण परविन किफायद शेख ही काही दिवसांपासून आजारी होती. आपला भाऊ या जगामध्ये नाही ही माहिती जेव्हा तिला कळाली तेव्हा तिने देखील आपले प्राण सोडले. भावाच्या निधनाची बातमी तिला अजिबात सहन झाली नाही. या घटनेने संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली. अशात आता कुटुंबातील दोन्हीही मुलांच्या मृत्यूने आई आणि भाऊ एकटे पडले आहेत. तसेच सिंदी रेल्वे परिसरात या घटनेने स्थानिक नागरिक देखील भाऊक झाले आहेत.