धक्कादायक : बाळाच्या नशिबात आईच प्रेम नव्हताच! बाळाला स्तनपान करत असतानाच आईचा मृत्यू

बुलढाणा : आजच्या धावत्या युगात अपघाताचे प्रमाण वाढतच चालले आहे. हे अपघात पाहून आपण ही हळहळ व्यक्त करतो. परंतु तेव्हा उशीर झालेला असतो. हाच प्रकार बुलढाणा जिल्ह्यात देखील झाला आहे.
थोड्याशा चुकीमुळे होत्याच नव्हत झालं.बाईक वरून जात असतानाच एका महिलेचा बाळाला दूध पाजताना अपघात झाला आहे. त्यातच ती जागेवरच ठार झाली. मिळालेल्या माहितीनुसार अकोला येथील देशमुख दाम्पत्य हे लहान मुलीला घेऊन खामगाव या ठिकाणी आले होते.
परत वापस जाताना अकोल्याला जाताना अपघात झाला. जात असताना शीतल देशमुख या लहान मुलीला दूध पाजत होत्या.त्यावेळीच त्या गाडीवरून खाली पडल्या खाली पडल्या असतानाच त्यांच्या डोक्याला मार लागला. मेंदूला जास्त मार लागल्याने त्या जागीच मरण पावल्या.
तर चिमुकली रियांश देशमुख मार बसल्यामुळे दवाखान्यात उपचार घेत आहेत. या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. तर या घटनेमुळे देशमुख कुटुंबावर खूप मोठा दुःखाचा डोंगर पसरला आहे.