धक्कादायक | लग्नाला तीन दिवस बाकी होते आणि नळातून लाला पाणी आले;पुढे जे घडलं ते थरकाप उडवणार होत

खंडवा | लग्न म्हटल्यावर सगळीकडे वेगळाच उत्साह आणि आनंद असतो. यात मुलीच्या घरी तर वेगवेगळ्या पद्धतीने रीती रीवज पूर्ण करत लग्न केले जाते. मात्र लग्नाला अवघे तीन दिवस बाकी असताना एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात ज्या मुलीचे लग्न होते तिचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेने लग्न समारंभातील सर्वच व्यक्ती व्याकूळ झाले आहेत.
रजनी असे मृत मुलीचे नाव आहे. ती मूळची मध्यप्रदेशची असून खंडवा महानगर पालिकेत चौथा पदावर नोकरी करत होती. ती लिपिक म्हणून येथे कार्यरत होती. कामानिमित्त इथेच तिने भाड्याने एक घर घेतले होते. या घरात तिच्या बरोबर तिची एक मैत्रीण देखील राहत होती. राधिका असे तिच्या मैत्रिणीचे नाव आहे. रजनीचे कुटुंबीय पांधना येथील हिमगिरी येथे राहतात.
प्रेम प्रकरणातून रजनीचा खून झाल्याचे समजले आहे. पुण्यात कार्यक्रत असलेल्या कपिल शहा या व्यक्तीवर रजनी प्रेम करत होती. त्यामुळे ती सतत त्याला लग्नासाठी विचारत होत्या. मात्र या लग्नाला कपिल सहमत नव्हता. कपिल हा मूळचा बुरहानपूरचा रहिवासी आहे. तो पुण्यातून खंडवाला आला होता. त्यावेळी रजनी त्याला घरी घेऊन आली आणि तिची हत्या झाली.
कपिल आणि रजनी हे गेल्या अनेक दिवसांपासून एकत्र होते. दोघांचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र रजनी मोठ्या घरातील आहे असे कारण सांगत तो तिला लग्नाला नकार देत होता. मात्र घरी आल्यावर रजनिने त्याला लग्नासाठी खूप विनवणी केली. यात संतापून त्याने तिच्या पोटात आणि पाठीत चाकू घुसवला. तसेच तिला पाण्याच्या टाकीत टाकून दिले.
नंतर जेव्हा मैत्रीण घरी आली तेव्हा तिला घराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यामुळे ही माहिती तिने रजनीच्या घरी सांगितली तेव्हा रजनीचे आई आणि भाऊ तिच्या घरी आले. त्यांनी पाहिले की, घरात सगळीकडे रक्त आहे. तसेच नळातून लाला पणी येत आहे. पोलिसांना याची माहिती मिळाल्यावर पाण्याची टाकी तपासली असता रजनीचा मृत देह तिथे सापडला.
हत्या करून कपिल त्याच्या गावी निघून गेला होता. मात्र तेथील पोलिसांनी त्याला अटक केली आणि शिकारापुर पोलिसांनी त्याला खंडवा येथे आणले. यावेळी त्याने सांगितले की, “मी आधीच दुसऱ्या एका तरुणीच्या प्रेमात होतो. मात्र रजनी मला लग्नासाठी खूप त्रास देत होती. माझ्या प्रेयसीच्या लग्नाची माहिती मला मिळाली होती. त्यामुळे मी खूप टेन्शनमध्ये होतो. त्यात रजनी माझ्यावर दबाव आणत होती. त्यामुळे मी तिची हत्या केली.” असे कपिल म्हणाला. पोलीस आता त्याच्यावर पुढील कारवाई करत आहेत.