मनोरंजन

धक्कादायक! या प्रसिद्ध अभिनेत्याचा शूटिंग दरम्यान झाला मोठा अपघात…

मनोरंजन विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बॉलीवूड मधील एका मोठ्या अभिनेत्याला गंभीर दुखापत झाली आहे. या दुखापतीमध्ये त्याला असह्य वेदना सहन कराव्या लागत आहेत. सध्या अभिनेता परदेशी उपचार घेत आहे.

 

अभिनेता-राजकारणी सनी देओलची प्रकृती सध्या ठीक नाही. त्यामुळे सनी देओल अमेरिकेत राहून उपचार घेत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार काही आठवड्यांपूर्वी त्याच्या आगामी एका प्रोजेक्टच्या शूटिंगदरम्यान त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. त्यावर तो आता उपचार घेत आहे.

 

सनी आता ६५ वर्षांचा झाला आहे. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्याच्या पाठीला लागले. त्यामुळे मुंबईमध्ये त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र इथे त्याला बरे वाटत नसल्याने तो अमेरिकेला गेला आहे. पंजाबमधील गुरुदासपूरमधून लोकसभा खासदार असलेला सनी आपल्या दुखापतीमुळे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या शपथविधीला उपस्थित राहू शकला नाही.

 

सनी देओल लवकरच दिग्दर्शक आर बाल्की यांच्या ‘चूप’ या चित्रपटात पूजा भट्ट आणि दुल्कर सलमानसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय तो ‘गदर 2’ आणि ‘अपने 2’ मध्येही तो दिसणार आहे. मल्याळम क्राईम थ्रिलर ‘जोसेफ’चा हिंदी रिमेक असलेल्या ‘सुर्या’ चित्रपटामध्ये देखील तो दिसणार आहे. एप्रिलमध्ये सनीने या चित्रपटातील तिचा पहिला लूक सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला होता. त्याला खूप पसंती मिळाली.

 

सनी देओलने एप्रिल 2019 मध्ये
भारतीय जनता पार्टी (भाजप) मध्ये प्रवेश केला आणि गुरुदासपूरमध्ये काँग्रेस नेते सुनील जाखड यांच्या विरोधात निवडणूक लढवली. सनीने 82 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला. सनी देओलचा अभिनयामुळे त्याचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. याचाच फायदा त्याला त्याच्या निवडणुकीमध्ये देखील झाला. सनीने आत्तापर्यंत अनेक सुपरहिट चित्रपट या सिनेसृष्टीला दिले आहेत. तो सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. आपल्या कुटुंबाबरोबर घालवलेले क्षण चाहत्यांबरोबर शेअर करतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close