निःशब्द : आईवडिलांच्या निष्काळजी पणामुळे चार वर्षाच्या गोंडस चिमुरडी चा गेला जीव. खेळायला जाते म्हणून घराबाहेर गेली अन् परातलीच नाही

बीड: गेल्या काही दिवसांपासून अपघात दुर्घटना होताना आपण पाहत आहोत. अशीच एक दुर्घटना बीड जिल्ह्यात घडली आहे. या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्राचे राख साठवणूक करण्यासाठी एक तळे तयार केले होते. या तळ्यात पाण्याच्या डोहात पडून एका चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
चार वर्षाची साक्षी खेळायला बाहेर जाते अस सांगून घराबाहेर पडली होती. ती खेळत असतानाच तळ्याच्या शेजारी आली. या ठिकाणी तल्यापासून जात असताना तिचा पाय घसरला आणि ती त्यात पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. चिमुरडीचा घरच्यांना ही घटना कळताच सर्व जण त्या ठिकाणी धावत आले. साक्षीच्या आईवडिलांचे मोठा धक्काच बसला. साक्षी पवार हिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला.
चिमुरडीच्या मृत्यू ने सारा गाव हळहळला…
साक्षी पवार हीच घर डबक्याच्या फक्त १०० मीटर अंतरावर आहे. चिमुरडी साक्षी ही आपल्या भावासोबत आणि बहिणी सोबत डबक्यात खेळत होते. खेळत असताना ही दुर्घटना पहिली. साक्षीच्या ७ वर्षाचा भाऊ हा पाहत होता. त्याने घरच्यांना जाऊन लगेच सांगितले. या घटनेने सारा गाव हळहळला.
एक वाचली…दुसरी दगावली…
दोघी बहिणी बुडताना पाहून भावाने घरी सांगितले .घरच्यांनी दोघींना डबक्यातून बाहेर काढले. एक बहिण वाचली. परंतु चिमुरड्या साक्षी दगावली गेली. या घटनेमुळे साऱ्या गावातून हळहळ व्यक्त होत आहे. अशा दुर्घटना होत असतात म्हणून पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. लहानशा चुकीमुळे किंवा आपल्या दुर्लक्षामुळे आपल्या मुलांना जीव गमवावा लागतो.याचे आईवडिलांना भान राहिले पाहिजे.