निःशब्द : नवीन वर्षाच्या सुरुवातीला कुटूंब झालं क्षणात उध्वस्त, पतीच्या चुकीमुळे बायकोला आणि मुलीला गमवावा लागला जीव.

नागपूर : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घरात काहीतरी नवीन वस्तू घेऊन येण्याची प्रत्येकाची स्वप्ने असतात. नवीन गाडी घेऊन आल्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याला त्याचा आनंद घेता यावा अशी इच्छा देखील असते. परंतु आपण आनंदातच असताना काही चूक झाली तर त्या आनंदावर विरजण पडते. अशीच एक दुःखद घटना नागपूर जिल्ह्यात घडली आहे . घरात नवीन गाडी आल्यानंतर ती पत्नीला शिकवत असताना अपघात होऊन पत्नी आणि मुलीला आपला जीव गमवावा लागला.
सूत्रांकडून आलेल्या माहितीनुसार नागपूर जिल्ह्यात देऊळगाव राजा येथील अमोल मुरकुटे हे आपल्या बायको आणि मुलीसोबत राहत होते. ते रामनगर या ठिकाणी शिक्षक पदावर कार्यरत होते.त्यांनी नवीन वर्षा निमित्त नवीन गाडी घेतली होती. ती गाडी आपल्या बायकोला शिकवत होते. त्या दोघं सोबत त्यांची मुलगी सिध्दी मुरकुटे देखील होती.
यावेळी बायकोला गाडी शिकवत असताना रोड वरचे नियंत्रण सुटले आणि रोडच्या बाजूला असलेल्या ७० फूट विहिरीत गाडी पडली. अमोल मुरकुटे हे गाडीच्या खिडकीच्या काचा फोडून कसेबसे बाहेर निघाले परंतु सिध्दी आणि त्यांची बायको स्वाती मुरकुटे हे दोघेजण गाडीतच अडकले गेले. त्या दोघींच्या नाका तोंडात पाणी गेल्याने दोघींचा सुध्दा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
या घटनेमुळे अमोल मुरकुटे हे जखमी झाले होते. त्यांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जाण्यात आले. त्यांच्यावर उपचार चालू आहेत. तसेच स्वाती आणि सिध्दी यांना विहिरीतून बाहेर काढण्यासाठी अग्निशामक दल तसेच पोलिस दल हे घटना झालेल्या ठिकाणी पोहोचले आहेत.
नागपूर मध्ये तसेच महाराष्ट्रात रस्त्यावरील अपघात चालू असतानाच गाडी शिकवताना झालेला अपघातामुळे एका शिक्षक कुटुंबावर शोककळा पसरली आहे. तसेच या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.