निःशब्द,बाप लेकीचं वेड प्रेम, वडिलांच्या झालेल्या मृत्यूमुळे बसलेल्या धक्क्यात मुलीनेही संपवले आपले जीवन

भोपाळ: गेले काही दिवसापासून आत्महत्या चे प्रमाण वाढले आहे. काही सामूहिक आत्महत्या होत आहेत तर काही अत्याचाराला कंटाळून आत्महत्या करीत आहेत. तर काही नाराजगी मुळे आत्महत्या करत आहेत. मध्य प्रदेश मध्ये अशीच एक घटना घडली आहे. एका व्यक्तीचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला. हा धक्का त्याच्या मुलीला सहन झाला नाही. त्यामुळे तिनेही आपले जीवन संपवले.
आपल्या वडिलांचा मृत्यू झाल्याचे समजताच एका अकरा वर्षाच्या मुलीने विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. शेजारी असलेल्या नागरिकांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचा काही उपयोग नाही. एकच कुटुंबातील दोन व्यक्ती गेल्यामुळे कुटुंबात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार अशोक नगर जिल्ह्यात बरखेडा या गावात 36 वर्षीय युवकाचा हार्ट अटॅक मुळे मृत्यू झाला. अमृत तरुणाचे नाव आहे रामबाबू धाकड. रामबाबू धाकड हे शेती करत होते. शुक्रवारी सकाळी शेतात गेल्यावर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे ते शेतातून घरी माघारी आले.
घरी आल्यावर त्यांच्या आणखीन जोरात दुखू लागले त्यामुळे घरच्यांनी आणि शेजारच्यांनी त्यांना दवाखान्यात घेऊन गेले. परंतु रस्त्यात त्यांना हार्ट अटॅकचा जोराचा धक्का आला. हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
रामबाबू चा मृत्यू झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला. रामबाबू यांना साधनां नावाची अकरा वर्षाची मुलगी होती. साधनाला वडिलांच्या मृत्यूचा धक्का सहन झाला नाही. त्यामुळे ती पळत शेताकडे निघून गेली. शेतात जाऊन तिने शेतामध्ये असलेल्या विहिरीत उडी मारली. साधना ही धावत शेताकडे गेलेली नातेवाईकांनी पाहिली होती.
तिला शोधण्यासाठी नातेवाईक शेतामध्ये गेले परंतु त्यांना कोणी दिसले नाहीत. साधनाला शोधण्यासाठी गेलेले लोकांना विहिरीच्या जवळ साधनाच्या चपला दिसल्या. लोकांनी पाहिले असता साधना विहिरीमध्ये बुडालेली दिसली. शोधायला गेलेल्या लोकांनी पोलिसांना ही माहिती दिली. दोन तासानंतर पोलिसांनी गावकऱ्यांच्या मदतीने साधनांचा मृतदेह बाहेर काढला.
रामबाबू यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. या मधील साधना ही तिसऱ्या नंबरची मुलगी आहे. साधना ही शाळेच्या वर्गात सातवीच्या वर्गात शिकत होती. एकाच कुटुंबातील एका दिवशी दोघांचा मृत्यू झाल्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली होती. गावकऱ्यांनी दुपारी चार वाजता या दोघांवर अंत्यसंस्कार केले. दोघांच्या मृत्यूमुळे गावभर शोककळा पसरली होती. लोकांनी साधनाच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त केली.