विशेष

निःशब्द : पंढरपुरात पेपर लिहीत असताना हुशार व गोंडस चिमुकलीचा गेला जीव, दुर्लक्ष केले अन् अनार्थ घडला.

पंढरपूर: पंढरपूर येथील शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे. पेपर लिहीत एका नऊ वर्षाच्या चिमुकलीचा जीव गेला. पंढरपूर येथील अरिहत या इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये ही घटना घडली. या घटनेत मृत झालेल्या मुलीचे नाव अनन्या भादुले आहे. गेल्या आठवड्यात या शाळेतील पेपर चालू होते.

 

अनन्या भादुले ही पेपर देण्यासाठी शाळेत आली होती. अनन्य भादुले ही परीक्षेचा पेपर लिहीत होती. पेपर लिहीत असताना तिला झटका आला असे तिच्या वर्गात असणाऱ्या शिक्षकांनी सांगितले. अनन्याला झटका आल्यानंतर वर्गातील शिक्षकांनी तिला लगेच दवाखान्यात घेऊन गेले. परंतु अनन्यावर उपचार करण्या अगोदरच तिचा जीव गेला. अनन्यही गेल्या काही दिवसापासून आजारी होती .तिला अधून मधून ताप येत होता.

 

गेले काही दिवसापासून अनन्या आजारी होती. अनन्याला कालपासून जरा थोडेसे बरे झाल्यासारखे वाटत होते. तिचे शाळेतील पेपरही चालू होते. पेपर चालू असल्यामुळे गुरुवारी ती शाळेत पेपर देण्यासाठी आली होती. परंतु शाळेत पेपर लिहीत असताना तिला अचानक झटका आला आणि खाली पडली.

 अनन्याला झटका आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले . परंतु डॉक्टरांनी तिला मृत झाल्याचे सांगितले. जास्त ताप आल्याने तो मेंदूपर्यंत पोहोचला आणि ब्रेन हॅमरेज झाले त्यामुळे अनन्यता मृत्यू झाला असे डॉक्टरांनी सांगितले. चिमुकल्या मुलीच्या मृत्यू ने भादुळे कुटुंबावर शोककळा पसरली. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकांनी आणि परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close