निःशब्द! अंगावर चायनीजचा गाडा पडून पोलीस पुत्राचा दुर्दैवी मृत्यू; कारण जाणून धक्काच बसेल

निःशब्द! अंगावर चायनीजचा गाडा पडून पोलीस पुत्राचा दुर्दैवी मृत्यू; कारण जाणून धक्काच बसेल
सोलापूर | सोलापूरात एक धक्कादायक घटना घडली आहे. तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या एका चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सदर चिमुकल्यांचे वडील हे पोलीस दलात कार्यरत होते. ते सोलापुरातील एसआरपीफ कॅम्प मध्ये राहत होते. सदर मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव संस्कार बालाजी मुंडे (वय – 8) असे आहे.
सदर घटना ही शुक्रवारी घडली आहे. एसआरपीएफ परिसरात एक चायनीजचा गाडा आला होता. मात्र तो गाडा अचानक पलटला आणि सदर चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. सदर घटनेनं पूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. चायनीज ची गाडी ज्या ठिकाणी लावली होती. त्या परिसरात संस्कार खेळत होता.
मात्र अचानक ती गाडी पलटली आणि होत्याचं नव्हत झालं. त्यानंतर संस्कारला ताबडतोप रूग्णालयात दाखल करण्यात आले मात्र काही वेळातच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. संस्कार हा इयत्ता 3 री मध्ये शिकत होता. घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सर्वांचा लाडका संस्कार या जगाला सोडून गेल्याने शोकाकुल बॅनर झळकले आहेत.
सध्या नागरिकांकडून या घडलेल्या घटने बाबत शोककळा व्यक्त केली जात आहे. मात्र हा अपघात घडलं असल्याचे नोंद करण्यात आली आहे. एसआरपीएफ परिसरात देखील मोठी शोककळा पसरली आहे.