कृषी अपडेट

Soyabin anudan update : सोयाबीन अनुदान; या शेतकऱ्यांना मिळणार सोयाबीन अनुदान ,लवकर अर्ज करा.

Soyabin Anudan Maharashtra 2022

Soyabin Anudan: नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचे जीवन हे फार धकाधकीचे चे असते. कधी पाऊस जास्त असल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जातात तर कधी पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांची पिके करपून जातात.  अशा वेळी शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी निर्माण होती. शेतकऱ्यांना थोडीशी मदत म्हणून सरकार त्याच्या पिकांवर अनुदान देत असते. हे अनुदान कोणाला मिळते. कसे मिळते याची आपण सविस्तर माहिती घेणार आहोत.(Soyabin Anudan update)

Soyabin anudan update in Maharashtra: सोयाबीन अनुदान

मिञांनो काही कारणामुळे २०१६-१७ चे सोयाबीन चे अनुदान हे शासनाकडून वितरीत झाले नव्हते. तेही अनुदान लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत. ५ डिसेंबर  २०२२ रोजी  मंत्रिमंडळात घेण्यात आलेल्या बैठकीत हा प्रलंबित असणारा महत्वाचा निर्णय घेतला गेला. सोयाबीन ची झालेली मोठ्या प्रमाणात वाढ यामुळे सोयाबीनचे दर अचानक ढासळले गेले.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले.(soyabin anudan update)

यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळावा यासाठी महाराष्ट्र सरकारने ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन चे पीक घेतले होते. त्यांना डिसेंबर २०१७ रोजी अनुदान देण्याची घोषणा केली. महाराष्टातील खाजगी सोयाबीन विक्री संस्था किंवा इतर ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन विकली होती. त्यांना सरकार कडून अनुदान मिळणार होते.(soyabin anudan)

त्यासाठी ११२ कोटी रू सरकार कडून मंजूर झाला.आणि याच योजनेमधून जे शेतकरी प्रलंबित होते. त्यांना सरकारने १ कोटी ६१ लाख५१ हजार रु मंजूर केले आहेत. बाजार समितीमध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन ची विक्री केली आहे त्यांना १०८ कोटी मंजूर केले आहेत.

सोयाबीन पिकाच्या अनुदानाची अमलबजावनी ही नियमितपणे होत नसल्या कारणाने या योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने  २०२२-२३ या वर्षासाठी १००० कोटी ची तरतूद केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *