कृषी अपडेट

Soyabin Bajarbhav new update : शेतकऱ्यांसाठी महत्वाचे! सोयाबीनला भाव कमी आला तर विकायची घाई करू नका, हे काम करा

Soyabin Bajarbhav new update

 Soyabin Bajarbhav new update | शेतकरी मित्रांनो सद्या सोयाबीनच्या दरात सतत चढ उतार होत असल्याने शेतकऱ्याच्या मालाची हेळसांड होत आहे. (Soyabin Bajarbhav in November)

सोयाबीनला मनासारखा दर मिळत नाही त्यामुळे शेतकरी देखील नाराज आहेत. सोयाबीन हे नगदी पीक असल्याने त्याला प्राधान्य दिले जात आहे.गेल्या वर्षी सोयाबीन लाग जास्त भाव मिळाला होता यावरशी ही शेतकऱ्यांनी या आशेवरच सोयाबीन ची पेरणी केली होती. (Soyabin Bajarbhav new update)

परंतु या वेळेस शेतकऱ्यांची ही आशा फोल ठरली ,त्यामुळे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे की सोयाबीन कमी दरात विकण्यापेक्षा तारण ठेवून आपल्या गरजे पुरता पैसा उभ करावा. परंतु सोयाबीन उत्पादक शेतकरी यासाठी तयार नाहीत.काही जिल्ह्यात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
तस पाहिलं तर या वर्षी जास्त पावसामुळे सोयाबीन ल मोठा धोका झाला होता. काढणीच्या वेळी आलेल्या पावसामुळे जवळपास ३०% पर्यंत उत्पादन कमी झाले. (Soyabin Bajarbhav in maharashtra)

सोयाबीनचे भाव यावर्षी चांगले मिळाले तर झालेला खर्च भरून निघेल असे मत शेतकऱ्यांचे होते. परंतु सद्या गेल्या वर्षी पेक्षा कमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांत नाराजी निर्माण झाली आहे. सद्या सोयाबीनला दर कमी असल्याने शेतकऱ्यांनी सोयाबीन तारण ठेवावी व आपल्याला लागणारा पैसा उभा करावा असे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

शेतमाल तारण योजना : (shetmal taran yojana 2022)
शेतकरी मित्रांनो शेतमाल तारण योजना याबद्दल आपण माहिती पाहू .आपल्याला बऱ्याच वेळेस आपला माल कमी किमतीत विकावा लागतो. एकाच वेळी बाजारात एकदम माल आल्यामुळे  दरात घट होत असते. परंतु शेतमाल बाजापेठेत साठून ठेवला आणि नंतर विक्रीसाठी पाठवला तर अपेक्षेप्रमाणे दर मिळू शकतो.

परंतु शेतकऱ्यांना पैशाची गरज असते म्हणून शेतकरी कमी भावात माल विकून टाकतात. शेतकऱ्यांच्या या समस्येसाठी कृषी विभागाने 1990-91 या वर्षी पासून शेतमाल तारण कर्ज योजना अमलात आणली. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना आपला माल तारण म्हणून बाजार समितीकडे ठेऊन कर्ज घेता येते. हे कर्ज शेतकऱ्याला मालाच्या 70 ते 75 टक्के एवढी रक्कम  दिली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक गरज भगते.

तरणकर्जाचे व्याज व मुदत –
तारण कर्ज योजनेत फक्त शेतकऱ्याच माल घेतले जातात. व्यापारी या योजनेसाठी पात्र असणार नाहीत. या योजनेसाठी 6 महिन्याची मुदत दिली जाते .तसेच या कर्जावर 6 टक्के व्याज आकारले जाते. शेतमाल तारण कर्ज योजना ही बाजार समितीकडून राबवली जाते. सहा महिन्याच्या अगोदर जर कर्ज फेडले तर ३% व्याज समितीला मिळते.

तारण कर्ज हे या पिकांवर दिले जाते
महाराष्ट्र सरकारकडून राबवलेल्या या योजने अंतर्गत तुर, मग,मटकी, ज्वारी,उडीद, बाजरी,मका, गहू, हरभरा या पिकासाठी कर्ज दिले जाते. याची अधिक माहिती जवळच्या बाजार समिती मध्ये जावून आपल्याला घेता येईल. (Soyabin crop information)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *