दहावीचा निकाल अन् काहींचा उत्साह तर काहींची धरपकड…

पुणे | आज राज्यात दहावीचा निकाल जाहीर झाला. संपूर्ण राज्यातून अनेक विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवलं. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली. दर वर्षी प्रमाणे यंदा देखील शेकडो विद्यार्थी १० विच्या परीक्षेला बसले होते. आज १० वीत अपार कष्ट घेऊन उत्तीर्ण झालेल्यांची कहाणी जाणून घेऊ.
आयुष्यातला पहिला बोर्डाचा पेपर म्हणजे १० वीची परीक्षा. प्रत्येक आई वडिलांच स्वप्न असतं की, आपल्या मुलाने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवावे. कारण दहावीच्या गुणांवरूनचं पुढे काय करायचे हे ठरत असते. या दहावीचा अभ्यास नीट व्हावा म्हणून अनेक पाकल आपल्या मुलांना महागडे जास्तीचे क्लास देखील लावतात. मुलांवर सतत अभ्यास कर अभयस कर असा दबाव ठेवतात. यात अनेक विद्यार्थी मन लावून अभ्यास करतात. पण बऱ्याच विद्यार्थ्यांना अभ्यास करण आवडत नाही. त्यामुळे ते नापास देखील होतात.
दहावीचा निकाल हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा असतो. दर वर्षी जून महिन्यातच हा निकाल लागतो. काही दिवस आधी बातम्यांवर निकालाच्या तारखा झळकू लागतात. विद्यार्थी त्या दिवसाची भीतीने वाट देखील पाहत असतात. अशात मग एक दिवस दुपारच्या सुमारास निकाल जाहीर होतो. प्रत्येकच विद्यार्थ्याच्या पोटात मोठा गोळा आलेला असतो. घरातील मोठी ताई, दादा आई बाबा निकाल पाहत असतात आणि आपण पास झालो आहोत असं समजतं. खरोखर ही प्रत्येकाच्या आयुष्यातली एक लढाई असते. यामध्ये जे जिंकतात त्यांचं भरभरून कौतुक होतं. मात्र जे हरतात त्यांना चांगलीच बोलणी खावी लागतात.
नापास झालेल्या विद्यार्थ्याच्या घरी जणू कुणी गेलं आहे अशा पद्धतीनं वातावरण परलेल असतं. अशात नातेवाईक आणि शेजारी जर आणखीन कुणाचा मुलगा चांगल्या मरकांनी पास झाला असेल तर मग भलताच राढा. आता हे असं वातावरण प्रत्येकच ठिकाणी पाहायला मिळत. हे झालं सर्वसामान्य कुटुंबातलं. पण गरीब घरातील देखील असे अनेक विद्यार्थी आहेत जे आपल्या संकटावर मात करून दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवतात.
साल २००५ मध्ये एका विद्यार्थिनीने आपल्या परिस्थितीशी दोन हात करून यश मिळवलं होतं. ती मुलगी तिचे आई वडील हे निराधार होते. त्यांना राहायला स्वतः च घर देखील नव्हतं. त्या मुलीचे बाबा आणि आई दिवसभर प्लास्टीकचे कागद गोळा करण्याचे काम करत होते. तसेच ते एका स्मशान भूमीच्या शेजारी एका झोपडीत राहायचे. ती मुलगी त्या शहरातील शासकीय विद्यायल्यात शिक्षण घेत होती. लहापणापासूनच ती हुशार होती. तिने दहावीचा अभ्यास स्मशान भूमी शेजारी असलेल्या झोपडीतून पूर्ण केला. अशात रात्रीच्या वेळी झोपडीत वीज नसल्याने तिला अभ्यास करता येत नसे. त्यामुळे स्मशानात कधी रात्रीच्या वेळी एखादं प्रेत आलं. तर त्याला अग्नी दिल्यावर पडणाऱ्या प्रकशात ती अभ्यास करायची. अशा पद्धतीने अभ्यास करून त्या मुलीने दहावीच्या परीक्षेत ८० % गुण मिळवले होते. त्या काळी झी चोवीस तास या चॅनलवर संघर्षाला हवी साथ हा कार्यक्रम प्रसारित होत होता. यामध्ये गरीब कुटुंबातील ज्या विद्यार्थ्यांनी खूप मेहनतीने चांगले गुण मिळवले आहेत. त्यांना काही संस्था मदत करायच्या. त्या मुलीला देखील तिच्या पुढील शिक्षणासाठी तेथून मदत झाली होती.
शिक्षण घेतलं तरच आपण आयुष्यात पुढे काही तरी करू शकतो. मात्र याचा वेगळा अर्थ अनेक जण घेताना दिसतात. शिक्षण घेणे म्हणजे चांगले गुण मिळवणे असे अनेकांना वाटते. मात्र रिझल्ट हा फक्त एक कागद असतो. कुणाला किती मार्क मिळाले यावरून त्या त्या मुलाचं भविष्य ठरत नाही तर तो विद्यार्थि एव्हढ्या दिवसात काय शिकला यावर त्याचं भवितव्य ठरत असतं. प्रत्येक मुलाची आकलन क्षमता सारखी नसते. त्यामुळे काही विद्यार्थि मागे राहतात तर काही पुढे जातात. मात्र ही गोष्ट सर्व पालक मंडळींनी समजून घेतली पाहिजे. आपल्या मुलाला चांगले मार्क मिळवने नाही तर चांगलं ज्ञान आत्मसात करणे शिकवल पाहिजे. प्रत्येकात वेगवेगळे गुण असतात. आपल्या पाल्यात असलेले गुण जाणून घेऊन त्याला त्या पद्धतीचे शिक्षण दिले पाहिजे. तरच ही मुलं मोठी होऊन भारताचे एक चांगले आणि सजग नागरिक बनू शकतील.