“अचानक येऊन मला सांगितलं की, तुझा खून होणार…”, बज्या बापूच्या मृत्यूमुळे भाऊक झाला मालिकेत अभिनेता….

मुंबई | झी मराठी या वाहिनीवरील देव माणूस ही मालिका खूप गाजली. त्यानंतर याच मालिकेचा दुसरा भाग देखील प्रेक्षकांच्या भेटीला आला. देव माणूस २ या मालिकेने देखील प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. मालिकेत जेव्हा इन्स्पेक्टर जामकरची एन्ट्री झाली त्यावेळी मालिकेत आणखीनच रंगत आली. इन्स्पेक्टर जामकरने अजित कुमारचा खरा चेहरा सर्वांसमोर आणला.
मालिकेमध्ये आतापर्यंत अनेक जणांचे खून झालेले आहेत. अशात अजित कुमारने पहिल्या भागापासून आपल्या जाळ्यात ओढलेल्या बज्या बापू देखील आता मरणार आहे.बाज्याने दोन्ही ही भागांमध्ये प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. मात्र आता अजित कुमारचा खरा चेहरा त्यांच्या समोर आला आहे. आजवर या बज्याने अजितच्या चांगल्या वरून अनेक गुन्हे केले आहेत. मात्र सत्य समोर आल्यानंतर त्याला आत्महत्या करावी वाटते.
आत्ताच या मालिकेचा शेवटच्या भागाचा एक व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. बज्या हे पात्र मालिकेत अभिनेता किरण डांगे साकारत आहे. त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंट वर या मालिकेचा शेवटचा सीन शेअर केला आहे. हे पाहून मालिकेतील एक दुसरा अभिनेता भाउक झाला आहे.
आतापर्यंत या मालिकेमध्ये खून होऊन अनेक कलाकार बाहेर पडलेत. त्यातीलच एक सागर कोरडे. किरणची ही पोस्ट पाहून त्याने देखील सोशल मीडियावर त्याला आलेल्या अनुभवा विषयी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने लिहिल आहे की,” मालिकेचा शेवटचा दिवस किती अवघड असतो हे मी समजू शकतो.. किरण आठवतं मला अचानक सांगितले होते की आता तुझा खून होणार. मी खुप भावुक झालो होतो. तुम्ही सगळ्यांनी माझी समजूत काढली होती.
वाईट माझे मालिकेतले काम संपणार म्हणून नव्हते वाटत, तर तुम्हाला सगळ्यांना सोडुन जायचे वाटतं होते. काम तर आजही चालुच आहे पण खरं प्रेम, खरा परिवार आपल्या देवमाणूस सेटवरच अनुभवायला मिळाला. बज्याबापुला नक्कीच प्रेक्षक खुप मिस करतील. कारण तुझ्याविषयी एक वेगळाच सॉफ्ट कॉर्नर तयार झाला होता प्रेक्षकांच्या मनात. तु खऱ्या अर्थाने बज्या हे पात्र जिवास भावा. किरण तुला पुढच्या वाटचालीसाठी मनापासून खूप शुभेच्छा…” त्याचीही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे.