इतर

नावविवाहित तरुणीची आत्महत्या! धक्कादायक कारण आले समोर

नवी मुंबई | महिलांवरील अन्याय आणि अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. यामध्ये अनेक नवविवाहित तरुणी बळी ठरत आहेत. अनेक तरुणी सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करत असल्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. फक्त गावाकडील आणि खेड्यापाड्यांमध्ये व्यक्ती आपल्या सुनेला जाच करतात असे नाही. अगदी शहरांमधील सुशिक्षित व्यक्ती देखील सुनांना जाच करताना दिसत आहेत.

अशीच एक घटना कोपरखैराणे सेक्टर 18 मध्ये घडली आहे. येथील एका नवविवाहित तरुणीला सासरच्या मंडळींनी केलेल्या जाचामुळे कंटाळून नवविवाहित मुलीने आत्महत्या केली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी या मुलीची आई तिच्या सासरी आली होती. यावेळी सासरच्या मंडळींनी मुलीला आणि तिच्या आईला शिवीगाळ केली. तसेच नंतर मुलीला मारहाण देखील केली. या सर्व गोष्टी सातत्याने आयुष्यात घडत होत्या. त्यामुळेच तिने हे टोकाचे पाऊल उचलले.

हर्षदा तरंगे असे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. साल 2020 मध्ये हर्षदा आणि हेमंत तरंगे या दोघांचा विवाह झाला होता. फक्त दोन वर्षांमध्ये मुलीला तिच्या सासरच्या मंडळींनी इतका त्रास दिला की तिने हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेतला. सासरी पती हेमंत तरंगे, सासू मिताली तरंगे, आण्‍णासो सासरे, धवल तरंगे – दिर आणि दिपाली मदने – ननंद ही मंडळी राहत होती. हे सर्वजण हर्षदाला सतत टोमणे मारून बोलत होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस चांगले गेले. मात्र नंतर सातत्याने सासरची मंडळी तिला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊ लागली.

यामध्ये तिची नणंद आणि दिर हे दोघे देखील तिला सतत टोमणे मारत असायचे. तसेच यावरून होणाऱ्या भांडणामुळे तिचा पती तिला मारहाण करायचा. सासरकडून तिला सतत माहेरच्या मंडळींकडे पैशांची मागणी कर असे सांगितले जायचे. हर्षदाच्या माहेरी परिस्थिती तितकीशी चांगली नव्हती. त्यामुळे तिला माहेरी पैसे मागावे वाटत नव्हते. पैसे न दिल्यामुळे देखील तिला मारहाण केली जात होती. अशात एक दिवस तिची आई वैशाली वाघमोडे यांनी मुलीच्या घरी हजेरी लावली. तसेच सासरच्या मंडळींची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र यावेळी त्या सर्वांनी वैशाली यांना देखील शिवीगाळ केली.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर हर्षदा पूर्णता खचून गेली. आपल्या आईचा झालेला अपमान तिला सहन झाला नाही. त्यामुळे तिने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. राहत्या घरी गळफास घेऊन तिने आत्महत्या केली. ही घटना घडल्यानंतर मुलीच्या आईने पोलिसांमध्ये याविषयी तक्रार दाखल केली. तसेच सासरच्या मंडळींनी आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप केला. आता या प्रकरणी पोलिसांनी मुलीच्या पतीला अटक केली आहे. तर इतर सदस्यांची देखील कसून चौकशी सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close