इतर

व्हिडीओ | आश्चर्यचकित ! बोलता बोलता हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी जे केलं ते कौतुकास्पद होत

कोल्हापूर | अचानक हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झालेल्या अनेक व्यक्तींच्या व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील. अशात आता हृदयविकाराचा झटका आल्याने डॉक्टरांनी प्रसंगावधान दाखवत एका रुग्णाचा जीव वाचवण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हाला देखील डॉक्टरचे कौतुक केल्याशिवाय राहवणार नाही.

व्हिडिओमध्ये दिसत आहे की डॉक्टर आणि रुग्ण तसेच त्याचे नातेवाईक एकत्र बसून चर्चा करत आहेत. यावेळी अचानक त्या रुग्णाला खुर्चीवर बसले असताना अस्वस्थ वाटू लागते. रुग्ण बेचैन होत आहे हे पाहून डॉक्टरांना समजते की याला काहीतरी समस्या आहे. त्यानंतर अचानक रुग्णाला हृदयविकाराचा झटका येतो. यावेळी डॉक्टर त्याच्यावर उपचार करत लगेच त्याचे प्राण वाचवतात.

सदर घटनाही कोल्हापुरातील आहे. कोल्हापूरमध्ये अर्जुन अडनाइक हे प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर आहेत. त्यांच्याच रुग्णालयात एका रुग्णाला हृदयविकाराचा आलेला झटका या व्हिडिओमध्ये दिसत आहे. रुग्णालयामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे असल्याने हा व्हिडिओ त्यामध्ये कैद झाला आहे. व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत असून सर्वजण डॉक्टरांचे कौतुक करत आहेत. तसेच आता हृदयरोग तज्ञ असलेले अर्जुन अडनाइक यांच्या प्रसिद्धीत आता वाढ झाली आहे.

 

 

त्यांच्याकडे आलेले रुग्ण आणि रुग्णाचे नातेवाईक त्यांच्याबरोबर बातचीत करत असताना खुर्चीवरती रुग्ण बसलेला होता. खुर्ची वरती बसलेला असताना अचानक त्याला छातीमध्ये कळ येऊ लागली. आपल्या रुग्णाची अवस्था पाहता डॉक्टरांनी त्याच्या छातीवर हलकासा दाब दिला. त्यामुळे यमराजाच्या तोंडात गेलेल्या रुग्णाला त्यांनी बाहेर खेचून आणले. त्यांची ही कामगिरी आता त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करायला भाग पाडत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत असून सर्वजण त्यांचे तोंड भरून कौतुक करत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close