विशेष

घरातला झोका खेळण क्यूट चिमुरडीच्या जीवावर बेतले, उस्मानाबाद शहरातील घटना…

उस्मानाबाद : कोणाचे मरण कशात हे सांगता येत नाही, आणि मरण कोणाला सांगूनही येत नाही. घरामध्ये बांधलेला झोकाच एका दीड वर्षाच्या चिमुरडीच्या मृत्युला कारणीभूत ठरला. घरातच झोका खेळत असताना ,झोका पडून आणि भीतीच्या विटा अंगावर पडुन उस्मानाबाद शहरातील दीड वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाला.

 

उस्मानाबाद शहरात ही हृदयद्रावक घटना शनिवारी दुपारच्या वेळी घडली. तिघी बहिणी झोका खेळत असताना घटना घडली. जखमी झालेल्या मुलींना दवाखान्यात दाखल केले आहे तर मृत मुलीचे नाव अर्चना पावरा हे आहे. या तिघी सख्या बहिणी आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.

 

तिघी बहिणी झोका खेळत असताना घडली दुर्घटना.

शहरात धनसिंग शिला पावरा हे आपल्या बायको आणि तीन मुलीसोबत राहत होते. येथील शेतकऱ्यांची गेल्या १५ वर्षापासून शेती करत आहेत. धनसींग पावरा आणि त्याची बायको रोजच्या प्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. धन सिंग ची आई आणि तीन लहान मुली या घरी होत्या. घरातील कच्या विटांच्या भिंती मध्ये असलेल्या पोल ला साडीने झोका बांधला होता. तिघी जनी या झोका खेळत असताना. भित खाली कोसळली.

 

भिंतीच्या विटा या तींघिंच्या अंगावर पडल्या. या घडलेल्या दुर्घटनेमुळे दीड वर्षाची असलेली अर्चना पावरा ही जागीच मरण पावली. त्याच बरोबर तिच्या फोन मोठ्या बहिणी जखमी झाल्या होत्या . त्या दोघींना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले. सरकारी दवाखान्यात त्यांच्यावर उपचार चालू आहेत .तर रात्रीच्या वेळी अर्चना पावरा हिला शोकाकुल वातावरणात अग्नी देण्यात आला. या चिमुरडीच्या मृत्यूने संपूर्ण गाव हळहळ व्यक्त करत होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close