इतर

वडिलांचं निधन झालं, मात्र रडत न बसता पिंपरीच्या तन्मईने UPSC परीक्षेत मारली बाजी

पुणे | UPSC परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर झाला. या निकालात यंदा पिंपरी चिंचवडमधील तन्मई देसाईने देखील बाजी मारली आहे. UPSC परीक्षेचा हा तिचा दुसरा प्रयत्न होता.

पहिल्या प्रयत्नात तिला अपयश आलं होतं. प्रिलीअम आणि मेन्स दोन्हींमध्ये तिला पहिल्यांदा अपयश आलं. मात्र खचून न जाता मोठ्या ध्येयाने तिने दुसऱ्याच प्रयत्नात यशाचं शिखर गाठलं.तन्मई लहानणापासूनच हुशार आणि अभ्यासू होती. तिला दहावीच्या परीक्षेत देखील चांगले गुण मिळाले होते. त्यामुळे घरच्यांनी तिला सायन्स घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र आपल देशप्रेम पूर्ण करण्यासाठी तिने आर्ट्स निवडलं.

तिने मानसशास्त्र या विषयात आपलं पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं. अभ्यासाबरोबर घर खर्चाला मदत व्हावी म्हणून तिने विश्वकर्मा या अकादमित सहाय्यक प्राध्यापीकेची नोकरी देखील केली.या दरम्यानच तिला अभ्यासाला पुरेसा वेळ न मिळाल्याने ती पहिल्यांदा UPSC मध्ये अनउत्तीर्ण झाली. या दरम्यान तिच्या डोक्यावरून वडिलांच्या मायेचं छप्पर देखील दूर गेलं.

वडिलांचे निधन झाले असले तरी खचून न जाता तिने पुन्हा एकदा जोमाने अभास सुरू केला. या दरम्यान तिने सहाय्यक प्राध्यापीकेची नोकरी देखील सोडली. संपूर्ण वेळ अभ्यासाला दिला आणि दुसऱ्याच प्रयत्नात यशला गवसणी घातली.

माध्यमांशी बोलताना तिने सांगितलं की, “UPSC चा निकाल लागला तेव्हा मी उत्तीर्ण झाली आहे यावर मला विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे मी पुन्हा एकदा निकाल पाहिला.”आपल्याला यशाबद्दल बोलत असताना पुढे ती म्हणली की, ” मी खूप आनंदी आहे. दुसऱ्याच प्रयत्नात यश मिळेल असं वाटलं नव्हतं. खूप लवकर यश मिळालं. माझ्या पेक्षा मला माझ्या कुटुंबीयांना पाहून खूप आनंद होत आहे.”

तन्मईने यंदा UPSC परीक्षेत बाजी मारत २२४ वा रँक मिळवला आहे. तिचे कुटुंबीय देखील यामुळे खूप खुश आहेत.
“आमच्या देसाई कुटुंबात एवढ्या मोठ्या पदावर जाणारी तन्मई पहिलीच आहे. आम्हाला तिचा अभिमान आहे.”, असं माध्यमांशी बोलताना तिचे आजोबा म्हणाले.UPSC च्या परीक्षेला अनेक विद्यार्थी बसतात. त्यातील काहींच्या पदरी अपयश देखील येतं. त्यामुळे अनेक जण खचून जातात. मात्र खचून न जाता तन्मई प्रमाणे पुन्हा तेवढ्याच जोमाने अभ्यास करायला हवा. वडील नसूनही तिने एवढ यशाचं शिखर गाठल्याने आज ती अनेकांसाठी एक आदर्श बनली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close