इतर
उन्हाची तीव्रता कमी झाल्याने नागरिक सुखावले

करमाळा | गेल्या काही महिन्यांपासून करमाळा तालुक्यासह पूर्ण राज्यामध्ये उन्हाची तीव्रता खूपच पाहायला मिळाली. राज्यातील नागरिकांना उन्हाच्या झळा बसत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. त्यामुळे नागरिक पावसाळ्याची वाट पाहत होते.
मात्र मागील काही तासांपासून राज्यातील आणि तालुक्यातील काही भागातील तापमानामध्ये विशेष घट आल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. नागरिक दुखावल्याचे दिसत आहे.
उन्हाच्या तीव्रतेमुळे नागरिक थंडपेय पित होते. यावर्षी थंड पेयाची विक्रमी विक्री झाली. तसेच उसाच्या रसाकडे देखील नागरिकांनी झेप घेतली. यावर्षी पाऊस लवकर पडणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.