सात महिने या अभिनेत्रीने मुलीला ठेवले सगळ्यांपासून दूर, सात महिन्यांनी केला आई झाल्याचा खुलासा

बाळ झाल्यावर प्रत्येक आई वडील हे खूप खुश असतात. अनेक व्यक्ती मुलगा असो अथवा मुलगी संपूर्ण परिसरात पेढे आणि बर्फी वाटत आनंद व्यक्त करतात. मात्र हिंदी मालिका विश्वातील एका अभिनेत्रीने आपण आई आई झाल्याची बातमी ७ महिने लपवून ठेवली. मात्र आता तिने या बाबत खुलासा केला आहे. आपल्या मुलीचे फोटो शेअर करत तिने असे का केले हे सांगितले आहे.
टीव्ही अभिनेत्री संगीता घोष हे छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. ‘देश में निकला होगा चांद’ या मालिकेत ‘परमिंदर कौर’ची भूमिका साकारून अभिनेत्रीने घराघरात पोहचली. सध्या ती ‘स्वर्ण घर’ या मालिकेत स्वर्ण बेदीची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने खुलासा केला की ती सात महिन्यांच्या बाळाची आई आहे. आता अभिनेत्रीने तिच्या छोट्या राजकुमारीचे काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने आपल्या मुलीला या जगापासून का लपवले हे देखील सांगितले आहे.
२५ डिसेंबर २०२१ रोजी या अभिनेत्रीने आपल्या मुलीला जन्म दिला. आपल्या गोड मुलीचे नाव तिने देवी असे ठेवले आहे. नुकतेच तिने तिच्या मुलीबरोबरचे काही सुंदर फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले. हे फोटो पाहून चाहत्यांना सुखद धक्काच बसला. कारण आता पर्यंत ती प्रेग्नेंट झाली कधी आणि मुलीला जन्म दिला कधी असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. त्यावर एका मुलाखतीत तिने याचे रहस्य सांगितले आहे. ती म्हणाली की, ”
गेल्या वर्षी 25 डिसेंबरला देवीचा जन्म झाला. ती 15 दिवस आयसीयूमध्ये असल्याने आमच्यासाठी ही चिंताजनक बाब होती. आम्ही बातमी लपवली असे नाही, पण योग्य वेळ येईपर्यंत आम्ही त्याबद्दल बोलायचे नाही असे ठरवले. ”
पुढे ती म्हणली की, “कधीकधी हे इतके अवास्तव वाटते की, मी माझ्या पतीला मला चिमटा काढायला सांगते. देवी खूप आनंदी मूल आहे आणि ती माझे पती राजीव शैलेंद्र सिंग यांच्या सारखीच दिसते. जेव्हा मी तिला पहिल्यांदा घेतला तेव्हा तिचे डोळे बंद होते. मग मी गायत्री मंत्राचा पाठ केला, त्यावेळी तिने डोळे उघडले आणि हसली. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही.”
अभिनेत्रीने साल २०११ मध्ये राजवी शैलेंद्र सिंह राठौरशी लग्न केले. लग्ना नंतर ती एकदा प्रेग्नेंट राहिली होती. मात्र तिचे बाळ तिने गमावले. त्यामुळे ती दुःखी होती. अशात नंतर देवी जन्माला आली. मात्र तिची प्रकृती देखील ठीक नव्हती त्यामुळे या दोघांनी ही गोष्ट लपवून ठेवली होती. मात्र आता देवी ठीक आहे आणि आई वडिलांबरोबर सुखी आयुष्य जगत आहे.