गौतमी पाटील एका कार्यक्रमासाठी घेते येवढे पैसे; अन् त्यानंतर

कोल्हापूर | गौतमी पाटील ही एक लावणी नर्तिका आहे. जी तिच्या लावणी नृत्यासाठी ओळखली जाते. तिच्या एका व्हिडीओमध्ये लावणी डान्समधील अश्लील मूव्ह दाखवल्यानंतर ती व्हायरल झाली. UrleBird वेबसाइटवरील तिचे TikTok व्हिडिओ सर्वात जास्त पाहिलेल्या व्हिडिओंपैकी एक आहेत. तिने अनेक उत्सवात तसेच कार्यक्रम आणि इव्हेंट्समध्ये तिने डान्स परफॉर्मन्स दाखवला आहे.
गौतमी पाटीलचा जन्म 1996 मध्ये कोल्हापूर, येथे झाला. गौतमी पाटीलचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यामध्ये ती नृत्यात काही अश्लील हातवारे आणि चाल दाखवत असताना दिसतेय. तिच्या अश्लील नृत्यासाठी लोक तिला ट्रोल करू लागलेत.
सुरुवातीला एका शोसाठी तिला 500 रुपयेच मिळत होते. आता तिला हजारो रुपयांचे एका शीचे मानधन मिळू लागलेय. तिन शिक्षण घेतल असतं तर ती नक्कीच चांगल्या हुद्द्यावर असती. आई एक कंपनीत कामावर होती. त्यानंतर आईला आजार झलंय तिन शिक्षण सोडलं आणि एका गुरूच्या मार्गदर्शनाखाली तिनं ऑर्केस्ट्रात नृत्य अभिनेत्री म्हणून काम सुरू केलं. गौतमी पाटील ही काही खास शो साठी लाखों चे मानधन घेते.
मध्यंतरी सांगली येथे गौतमी पाटीलचा शो होता यावेळी बरीचशी गर्दी जमली होती. अशावेळी तिच्या नाचण्यान सांगलीतील प्रेक्षकवर्गानं थैमान घातलं. अशावेळी एका तरुणाचा मृत्यू झाला. यामुळे आता पुन्हा एकदा तिच्या या नृत्यावर महाराष्ट्रभर शिंतोडे उडवले जात आहेत.
काही पत्रकारांनी तिला याबाबत प्रश्न देखील विचारले तरुण चाहते कार्यक्रमात इतके उत्साही झाले की गर्दी नियंत्रणाबाहेर गेली. शाळेच्या गच्चीवर काही लोक उभे होते. त्यामुळे शाळेच्या छताच्या फरशा तुटल्या. शाळेच्या भिंतीचेही नुकसान झाले. गौतमीचे नृत्य पाहण्यासाठी काही तरुण झाडावर चढले. या अवस्थेत पायदळी तुडल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला.