आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी! प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक मृत्यु, सुनील शेंडे काळाच्या पडद्याआड

मुंबई | काही वर्षांपासून अनेक दिग्गज कलाकार आपल्याला सोडून जात आहेत. काही महिन्यांपूर्वी स्वर्गीय गायिका लता मंगेशकर, ऋषी कपूर, कॉमेडियन राजू श्रीवास्तव आणि काही दिवसांपूर्वी सिद्धांत वीर सूर्यवंशी यांचं निधन झालं आहे. आता यातच अजून एक दुःखद घटनेला भ पडताना दिसतेय. जेष्ठ अभिनेत्यांचे निधन झालं आहे. त्यांचं वय वर्षे 75 होते.
विले पार्ले येथे असणाऱ्या आपल्या राहत्या घरात त्यांचं निधन झाल्याचं समजतंय. दुपारी एक वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याचं कळतंय. पारशीवाडा या ठिकाणी त्यांची अंत्ययात्रा काढून स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करता येणार आहे. मराठी तसेच हिंदी सिनेविश्वात काम केलेल्या अभिनेत्याच्या पश्चात 2 मुले,पत्नी सूना आणि नातवंडे असा त्यांचा परिवार आहे.
त्यांचा नाव अभिनेते सुनील शेंडे अस आहे. मराठीच नाही तर हिंदी चित्रपटातील वास्तव, गांधी तसेच सफरोश या चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा आवाज त्यांचं व्यक्तिमत्त्व यांमुळे त्यांनी अनेक राजकारणी भूमिका देखील वाठवल्या आहेत.
90 च्या दशकात त्यांनी मधुचंद्राची रात्र, निवडुंग, ईश्वर, जसा बाप तशी पोरं,नरसिंह यसारख्या चित्रपटात त्यांनी चांगल्या भूमिका केल्या आहेत. चित्रपटांप्रमाणेच त्यांनी त्याकाळी रंगभूमी देखील गाजवली होती.