विशेष

नवरी नटली, संगीत सुरु झाले, अन् वरात ऐवजी निघाली अंत्ययात्रा. नवरीचा अचानक मृत्यू झाला.

गुजरातमधील भावनगरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. घरामध्ये लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सर्वत्र जल्लोषाचे आणि आनंदाचे वातावरण होते. याच दरम्यान, अचानक आनंदावर विरजण पडले. नवरीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भावनगर येथील राणाभाई बुटावई अलगोटार यांचा मुलगा विशाल याच लग्न जिनाभाई राठोड यांची मुलगी हेतल हिच्याशी ठरलं होतं.सर्वजण आनंदाने लग्नाची तयारी करत होते. भगवानेश्वर मंदिरासमोर विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. घरात पाहुणे आणि नातेवाईकांची ये-जा सुरूच होती.

 

संगीत वाजत होते. थोड्याच वेळात दोघेही लग्नाच्या बंधनात अडकणार होते. पण कदाचित नशिबाने त्याच्यासाठी काहीतरी वेगळे ठेवले होते. लग्नाआधी हेतलचं डोकं दुखू लागलं. मोकळ्या हवेत श्वास घेता यावा म्हणून ती टेरेसवर पोहोचली पण तिथून खाली पडली.

 

घरातील लोकांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले. पण डॉक्टरांनी हेतलचा मृत्यू झाल्याचे स्पष्टपणे सांगितले. डॉक्टरांनी सांगितले की, हेतलला हृदयविकाराचा झटका आला होता, त्यामुळे तिला वाचवता आले नाही.

 

घरात मुलीच्या मृत्यूने शोककळा पसरली होती. यानंतर वधूच्या छोट्या बहिणीशी लग्न करण्याबाबत चर्चा झाली. दोन्ही कुटुंबीयांनी अखेर हा निर्णय मान्य केला.भावनगर शहराचे नगरसेवक व मालधारी समाजाचे नेते लक्ष्मणभाई राठोड म्हणाले की, घडलेली घटना अत्यंत दुःखद आहे. आपण तिला परत आणू शकत नाही, परंतु दु:ख नक्कीच कमी करू शकतो. त्यामुळे समाजाने एकत्र येऊन हा निर्णय घेतला.

समाजाचा विचार करता दोन्ही कुटुंबांनी घालून दिलेला आदर्श खरोखरच वाखाणण्याजोगा आहे. लग्नाचे विधी पूर्ण होईपर्यंत हेतलचा मृतदेह शवागारात ठेवण्यात आला. त्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close