सिनेसृष्टीचा तेजस्वी तारा हरपला! प्रसिद्ध कलाकाराचे निधान

मल्याळम चित्रपटसृष्टीतून एक दुःखद बातमी समोर येत आहे.
मल्याळम अभिनेते बाबुराज वझापल्ली यांचे रविवारी निधन झाले.
छातीत दुखू लागल्याने बाबुराज यांना तातडीने ओमसेरी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार,तिथे येण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. ते ५९ वर्षांचे होते.
बाबुराज यांच्या पश्चात पत्नी संध्या बाबुराज आणि मुलगा बिशाल असा परिवार आहे. मंगळवेढा सार्वजनिक स्मशानभूमीत रविवारी दुपारी दीड वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने मल्याळम चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.
बाबुराज यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात त्रिशूरमध्ये ड्रामा स्केचद्वारे केली होती. ते मल्याळम चित्रपट आणि डेली सोपमध्ये सक्रिय होते. त्यांनी अँड्रॉइड कुंजप्पन, सीआयए, मास्टरपीस, गुंडा जयन, ब्रेकिंग न्यूज, मनोहरन आणि अर्चना 31 नॉट आउट यासारख्या अनेक मल्याळम हिट चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या.
मल्याळी अभिनेता शरथ चंद्रन यांच्या निधनानंतर तीन दिवसांनी बाबूराज वझापल्ली यांच्या निधनाची बातमी आली. यामुळे चाहते आणि मल्याळम चित्रपटसृष्टीत आणखीन शोककळा पसरली आहे.
अभिनयासोबतच बाबुराज यांनी कलादिग्दर्शक, नाट्यदिग्दर्शक आणि पटकथा लेखक आणि प्रकाश दिग्दर्शनाच्या विविध कामात देखील आपले नशीब आजमावले आहे. ते कायमकुलम कोचुन्नी, मिनुकेट्टू, नंदनम, अय्यप्पनम वावरुम, तचोली ओथेनन, हरिशंदनम, कुंजली मारक्कर यांसारख्या अनेक मल्याळी प्रोजेक्टचा देखील भाग होते.