बैलपोळा ठरला अखेरचा, बैल धुण्यासाठी गेलेल्या काका पुतण्याचा दुर्दैवी अंत; वाचून डोळ्यात पाणी येईल

औरंगाबाद |बैलपोळा म्हटलं ग्रामीण भागात खूपच लगबग असते. अशीच लगबग औरंगाबादमधील फुलंब्री तालुक्यातील जळगाव मेटे येथील काळे यांच्या घरात सुरू होती.
पोळ्यासाठी बैलांना सजवण्याआधी त्यांना आंघोळ घालण्यासाठी तलावावर गेलेल्या काका पुतण्याचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. पंढरीनाथ कचरू काळे वय ३३ आणि रितेश अजिनाथ काळे वय १८ अशी बुडून मृत्यू झालेल्या काका पुतण्यांची नावं आहेत.
पोळा सणानिमित्त आदल्या दिवशी मृत पंढरीनाथ आणि रितेश हे काका पुतणे बैलांना धुण्यासाठी पाझर तलावात घेऊन गेले होते. पाझर तलावात बैल धूत असताना अचानक पंढरीनाथ यांना बैलाने झटका दिला. यामुळे काही कळायच्या आतच पंढरीनाथ यांचा तोल गेला आणि ते तलावात पडले.
शेजारी रितेश हा त्यांचा पुतण्याही होता. काका तलावात पडल्याचे पाहून सुरूवातीला तो घाबरला. काकांना वाचवण्यासाठी रितेशने तलावात उडी घेतली. मात्र काका आणि पुतण्या यांच्या नाकातोंडात पाणी गेल्याने त्यांना तलावाच्या बाहेर सुरक्षिततणे येता आले नाही.
गावात बैलपोळयाची तयारी सुरू असताना आणि काळे यांच्या घरातही सणाचा उत्साह सुरू असताना पोळ्याच्या पूर्वसंध्येला घडलेल्या या घटनेने काळे कुटुंब सुन्न झाले आहे.