इतर

देश हादरला! पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात 39 जवानांच्या बसला भीषण अपघात; या जवानांचा समावेश

श्रीनगर | भारत मातेच्या रक्षणासाठी सर्वच जवान जीवाची बाजी लावून सीमेवर तैनात असतात. यावेळी काही जवान शत्रू कडून होणाऱ्या चकमकीमध्ये शहीद होतात. यावेळी संपूर्ण देशात दुःखाची मोठी लाट उसळून येते. भारत मातेच्या संरक्षणासाठी आतापर्यंत अनेक जवानांनी आपले बलिदान दिलेले आहे. काही जवान गाडीचा अपघात झाल्याने देखील शहीद होतात. अशात आता पुन्हा एकदा अशीच एक दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेने पुन्हा एकदा भारतावरती मोठी शोक काळा पसरली आहे.

 

जम्मू काश्मीरमध्ये 39 जणांची बस ही एका नदीपात्रामध्ये कोसळली आहे. यामध्ये अनेक जवान शहीद झाले असून काही जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी बचाव कार्य पथक दाखल झाले असून बचाव कार्य सुरू आहे. पहलगाम येथील चंदनवाडी मधील बेताब खोऱ्यात ही मोठी दुर्घटना घडली आहे.

 

माध्यमांवर आलेल्या माहितीनुसार या बसमध्ये एकूण 39 जवान प्रवास करत होते. घटनास्थळी बचाव कार्यात दाखल झालेल्या पथकाकडून आतापर्यंत सहा जवानांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांची ही संख्या आणखीन वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बेताब खोऱ्यामध्ये 39 जवानांची बस रस्त्या जवळील नदीपात्रात कोसळली. त्यामुळे यामध्ये आतापर्यंत सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.

 

ITBP ने या घटने संदर्भातली माहिती दिलेली आहे. सदर दुर्घटनेत JKP चे २ आणि ITBP ३७ जवान होते असे सांगण्यात आले आहे. चंदनवाडी परिसरातील अमरनाथ गुफेकडून जवानांची ही बस पहलगामकडे निघाली होती. यावेळी गाडीचा अचानक ब्रेक फेल झाला आणि गाडी रस्त्याजवळ असलेल्या नदीपात्रात कोसळली.

सदर घटनेमध्ये हा अपघात झाला असून हा घातपात असल्याचा संशय वर्तवला जात आहे. आतापर्यंत अनेक जवान यामध्ये गंभीर रित्या जखमी झाले आहेत. त्याचबरोबर सहा जवान मृत्युमुखी पडले आहेत तसेच मृतांचा हा आकडा आणखीन 10 पर्यंत पोहोचू शकतो अशी शक्यता दर्शवली जात आहे. जवानांच्या निधनामुळे पुन्हा एकदा देशावरती मोठी शोक काळा पसरली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close