मनोरंजन

कुछ कुछ होता है चित्रपटातील क्युटशी अंजली आता झाली आहे खूप मोठी…

नव्वदच्या दशकातील “कुछ कुछ होता है” या चित्रपटाने मोठी हवा केली होती. चित्रपटातील कथा आणि यातील तगडी स्टार कास्ट या चित्रपटाला यशस्वी ठरण्यास फार महत्त्वाची होती. चित्रपटामध्ये शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या तिन्ही कलाकारांनी आपल्या दमदार अभिनयाने या चित्रपटाला चार चांद लावले होते. हा चित्रपट साल १९९८ रोजी प्रदर्शित झाला होता. आता या चित्रपटाला जवळजवळ 25 वर्ष होत आली आहेत. मात्र या चित्रपटाचे क्रेझ अजूनही कायम आहे.

चित्रपटांमधील सर्व कलाकारांबरोबरच अंजली हे पात्र भलतेच गाजले. या चित्रपटामध्ये अंजलीची भूमिका अभिनेत्री काजोल आणि एका बाल कलाकाराने साकारली होती. की बालकलाकार देखील अंजलीच्या भूमिकेमध्ये सरस ठरली. अंजलीच्या भूमिकेमध्ये असलेल्या बालकलाकाराचे नाव सना सईद असे आहे. सनाने या चित्रपटामध्ये दमदार अभिनय केला होता. त्यावेळी तिच्या अभिनयाचे सर्वत्र खूप कौतुक झाले. मधून सना विषयी अधिक माहिती जाणून घेऊ.

सना सईद या अभिनेत्रीचा जन्म 10 सप्टेंबर 1988 रोजी झाला. कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये ती पहिल्यांदा झळकली. या चित्रपटामध्ये तिने बाल कलाकार म्हणून पदार्पण केले. यावेळी ती अवघ्या दहा वर्षांची होती. मात्र तिचा अभिनय बोट मोठ्या अभिनेत्रींना देखील लाजवण्याजोगा होता. सना आता भरपूर मोठी झाली आहे. ती आता जवळपास 34 वर्षांची झाली आहे. अजूनही ती अभिनय क्षेत्रात सक्रिय आहे.

कुछ कुछ होता है या चित्रपटामध्ये अंजलीच्या भूमिकेने तिला घराघरात पोहोचवले. त्यानंतर या चिमुकलीने बादल आणि हर दिल जो प्यार करेगा या चित्रपटांमध्ये देखील बालकलाकार म्हणून अभिनय केला. या दोन्ही चित्रपटांमध्ये देखील तिने भरपूर प्रसिद्धी मिळवली. करण जोहर दिग्दर्शित स्टुडन्ट ऑफ द इयर या चित्रपटांमध्ये देखील तिच्या अभिनयाची झलक पाहायला मिळाली. तसेच साल 2008 मध्ये “लो हो गयी पूजा इस घर की” ही मालिका प्रदर्शित झाली होती. या मालिकेमध्ये देखील सनाने आपल्या अभिनयाची छाप उमटवली.

सना सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. ती आता खूप सुंदर आणि हॉट दिसते. आपले ग्लॅमरस अंदाजातील फोटो ति नेहमी चाहत्यांबरोबर शेअर करते. सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे. तिचा एक फोटो अपलोड होताच त्यावर लाईक्सचा पाऊस पडतो. अशात या अभिनेत्रीने आतापर्यंत बऱ्याच रियालिटी शोमध्ये आपले नशीब आजमावले आहे. खतरो के खिलाडी, झलक दिखला जा आणि नच बलिये अशा काही रियालिटी शो मध्ये ती झळकली होती. नच बलिये या रियालिटी शोच्या सातव्या पर्वात ती दीपेश शर्मा सोबत एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यावेळी दीपेश बरोबर तिचे नाव जोडले जात होते. अशी चर्चा होती की या दोघांमध्ये प्रेम संबंध आहेत. मात्र या सर्वांवरती प्रतिक्रिया देत अभिनेत्रीने सांगितले होते की, या फक्त एक अफवा आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close