विशेष

३ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूच्या विरहाने संपूर्ण कुटुंबाने संपवले जीवन..वाचून धक्का बसेल.

पाली : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रासह इतर राज्यात सुद्धा आत्महत्येच प्रमाण वाढलं आहे. या आत्महत्येला कारण काही ही असो पण सलग एकच कुटुंबातील चार व्यक्तीने आत्महत्या केल्याची मन हेलावणारी घटना राजस्थान मध्ये घडली आहे. राजस्थान मधील पली या ठिकाणच्या घडलेल्या या घटनेने परिसरात एकदम खळबळ माजली . एका चिमुरड्या मुलाच्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबच उध्वस्त झाले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार राजस्थानातील दाम्पत्याची आपल्या पाच वेशाच्या मुलीसोबत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या झालेल्या घटनेनंतर या कुटुंबात फकत एकच मुलगी शिल्लक उरली आहे. तीही शाळेत गेली असल्यामुळं बचावली असावी असं सांगितलं जातंय. या प्रकरणामुळे मृत कुटुंबाच्या असणाऱ्या नातेवाईकांना धक्का बसला आहे. या घटनेची माहिती पोलिसांना दिली असता पोलिसांचे पथक ताबडतोब घटना स्थळी पोहीलोचले आहे.

 

स्थानिकांच्या सांगण्यानुसार ही घटना पाली जिल्ह्यामधील राझी या गावची आहे. या गावात एकच कुटंबत असणाऱ्या तीन लोकांनी पाण्याच्या टाकीत उडी मारून आत्महत्या केली. भल्लराम मेघवाल याचा मुलगा भीमराव हा मुलगा आजारी होता.बुधवारी त्यांची पत्नी आणि मुलगी भीमराव ला दवाखान्यात घेऊन जात होते. परंतु दवाखान्यात जाण्यापूर्वीच भीमराव रस्त्यातच मरण पावला. यामुळे त्याच्या सगळ्या कुटुंबाला धक्का बसला.

 

तेथून परत माघारी येताना या तणावामुळे कुटुंबातील सगळ्यांनीच मृत मुळासोबत गावातील पाण्याच्या टाकीत उडी मारली. त्यामुळे भल्लारम्म त्याची पत्नी तसेच पाच वर्षाची मुलगी देखील मरण पावली. या घडलेल्या प्रकाराबद्दल गावकऱ्यांना माहिती कळताच त्यांनी पोलिसांना बोलावले. पोलिस ताबडतोब घटना घडलेल्या जागेवर पोहोचले. या ठिकाणी पोलिसांना तपासणी करत असताना सुसाईड नोट मिळाली.

 

पोलिसांनी गावातील लोकांची मदत घेऊन पाण्याच्या टाकीतील चार मृतदेह बाहेर काढले. या टाकी शेजारीच भल्लाराम यांची गाडी लावलेली होती.गाडीवर त्यांचे जाकीट अडकवलेले होते. त्या जाकीट मध्ये सुसईड नोट पोलिसांना मिळाली होते.

या नोट मध्ये आत्महत्येचे कारण लिहून ठेवले होते.परंतु पोलिसांनी आत्महत्येचे कारण उघड केलं नाही. एकाच घरातील चार व्यक्तीच्या निधनाने परिसरातील नागरिकांवर शोककळा पसरली. मेघवाल यांच्या कुटुंबातील 5 व्यक्तींपैकी एक मुलगी जिवंत आहे .ती ही शाळेत गेल्यामुळे या प्रकरणातून वाचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close