सत्यजित रे यांच्या प्रिय अभिनेत्याच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा, या गंभीर आजाराने घेतला शेवटचा श्वास

मुंबई | बंगाली चित्रपटसृष्टीवर दुःखाची लाट उसळली आहे. एका दिग्गज अभिनेत्याचे निधन झाल्याने बंगाली सिनेसृष्टीतील सर्वच कलाकार दुःख व्यक्त करत आहे. प्रसिद्ध दिग्गज अभिनेते प्रदीप मुखर्जी यांचे निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने बंगाली चित्रपटसृष्टीतील कधीही भरून न निघणारी पोकळी तयार झाली आहे.
प्रसिद्ध दिग्दर्शक सत्यजित रे यांच्या अनेक चित्रपटांमध्ये प्रदीप मुखर्जी यांनी अभिनय केला होता. सत्यजित रे आणि प्रदीप या दोघांमध्ये सुंदर मैत्रीचे नाते देखील होते. 1976 मध्ये आलेल्या जण आरण्य या चित्रपटातून प्रदीप यांना खूप प्रसिध्दी मिळाली. अभिनयाच्या कारकिर्दीत हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. हा चित्रपट सत्यजित रे यांच्या बॅनरखाली बनला गेला. त्यानंतर या जोडीने बुद्धदेव दासगुप्ता, ऋतुपर्णो घोष, दूरतवा, उस्तव अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.
कोलकत्यातील शिमल्याच्या चोरबागन भागात प्रदीप यांचा जन्म झाला. संमोहन मुखोपाध्याय आणि भक्ती मुखोपाध्याय असे त्यांच्या आई वडिलांचे नाव होते. 1965 साली त्यांनी हेअर स्कूलमधून आपले शालेय शिक्षण घेतले. नंतर पदवीच्या शिक्षणासाठी त्यांनी कोलकत्ता येथील सिटी कॉलेजमध्ये दाखला घेतला. 1973 मध्ये त्यांनी पदव्युत्तर शिक्षणाची डिग्री मिळवली. कॉलेजमध्ये शिकतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली होती. कॉलेजमधील अनेक नाटकांमध्ये ते सहभागी व्हायचे. त्यावेळी तपन थिएटरमध्ये त्यांनी अनेक नाटके केली.
अभिनयाची गोडी सांभाळत त्यांनी आपले शिक्षण देखील सुरू ठेवले होते. प्रदीप यांनी लॉचे देखील शिक्षण घेतले आहे. कॉलेजमध्ये अभ्यास करून वीकेंडला ते नाटकांमध्ये काम करायचे. 1974 रोजी दिग्दर्शक सत्यजित रे हे नक्षत्र थिएटर ग्रुप मध्ये आले होते. यावेळी त्यांची नजर प्रदीप यांच्यावर पडली. प्रदीप यांचा अभिनय पाहून ते भारावून गेले. त्यानंतर लगेचच आपल्या आगामी चित्रपटांमध्ये त्यांनी प्रदीप यांना कास्ट केले. अशात या प्रसिद्ध अभिनेत्याचे 29 ऑगस्ट 2022 रोजी फुफ्फुसांच्या आजारे निधन झाले. त्यांना जेव्हा जास्त त्रास होऊ लागला तेव्हा त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले. त्यांच्यावर खूप उपचार देखील करण्यात आले मात्र त्यांचा जीव वाचू शकला नाही. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी आणि मुलगा असा परिवार आहे.